बिलाल जलील यांचे मनपासाठी तयारीचे संकेत: MIMचा युवा चेहरा म्हणून येतोय समोर; इम्तियाज यांच्याप्रमाणे पत्रकार म्हणून काम


छत्रपती संभाजीनगर l मयूर वेरुळकर6 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

कुणी एकदा राजकारणात पडले की त्यांची पुढची पिढी देखील आपली राजकीय वाट चोखाळू लागते. वडील आमदार मुलगा किंवा सून खासदार किंवा एकाच घराभोवती राजकीय केंद्र स्थान असणे यात काही नवे नाही, याची अनुभूती आता एमआयएममध्येही येताना दिसून येत आहे. एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचे पुत्र बिलाल जलील यांच्या राजकीय लाँचिगसाठी अनेक कार्यक्रमात त्यांना पुढे करताना दिसून येत आहे.

Advertisement

एमआयएमच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी एमआयएमने महाराष्ट्राची निवड केली होती. यात बिलाल जलील यांच्या टीमनेच संपूर्ण नियोजन केले आहे. राज्याची निवड तसेच राज्यात पक्ष बांधणीसाठी देण्यात आलेले लक्ष यावरून एमआयएमची ताकद राज्यात वाढणार का असा प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहे.

गेली अनेक दिवस छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील हे चर्चेत आले आहेत. मात्र शहराच्या राजकारणत त्यांनी आपल्या मुलाला सक्रिय केल्याचे चित्र दिसून येत आहे. अगदी वेगवेगळया कार्यक्रमात असो की पक्षीय हायकंमाडसोबत वाढत असलेली जवळील यामुळे आगामी मनपा निवडणुकीसाठी खासदार जलील यांच्या मुलाला संधी मिळणार अशी चर्चा पक्षात सुरू झाली आहे.

Advertisement

मागील काही काळापासून खासदार इम्तियाज जलील हे मुलाच्या राजकीय लाँचिगसाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. याचीच तयारी म्हणून एमआयएमची दुचाकी रॅली असो की खासदार चषक प्रत्येक कार्यक्रमात बिलाल जलील हा युथ आयकॉन असल्याच्या चर्चांना एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून उधाण येताना दिसून येत आहे.

नेमके काय आहेत कारणे?

Advertisement
  • छत्रपती संभाजीनगर मनपात घरातील सदस्य नगरसेवक असल्यास शहरातील पकड मजबूत राहण्यास मदत
  • मुलांच्या राजकीय भवितव्यासाठी जनतेतून निवडून आल्यास फायदा
  • मुलाच्या खांद्यावर शहराची जबाबदारी दिल्यास पक्षातंर्गत विरोधकांना लगाम बसू शकेल
  • खासदार निधीसोबतच मनपाच्या निधीतून विमकास कामे करता आल्याने मतदारसंघावर पकड मजबूत करण्यास फायदा होऊ शकतो

छत्रपती संभाजीनगरला विरोध करणाऱ्या आंदोलनात देखील बिलाल जलील यांचा सहभाग दिसून आला आहे. युवकांच्या गराड्यात बिलाल जलील दिसू येत आहे. त्यांच्याकडे संघटनेचे पद नसले तरीसुद्धा पक्षातील युथ विंगमध्ये बिलाल जलील हे सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील जसे राजकारणात येण्यापूर्वी पत्रकारितेमध्ये काम करतानाच आपला राजकीय नेत्यासोबत जनसंपर्क ठेवला होता. बिलाल यांनी लंडनमधून पब्लिक policy चा कोर्स देखील केला असून द क्विंट या बेबसाईटसाठी काम केले आहे. गेले काही दिवस ते राजकारणात सक्रिय झाले आहे.

राज्यातील परिस्थिती काय?

Advertisement

सध्या प्रदेशाध्यक्ष जलील हे स्वत: छत्रपती संभाजीनगर मतदारसंघदाचे खासदार आहेत. तर मालेगाव आणि धुळे या दोन शहरांमध्ये एमआयएमचे आमदार आहेत. एक खासदार, दोन आमदारांसह राज्यातील विविध महापालिकांमध्ये पक्षाचे नगरसेवक निवडून आले होते. तसा एमआयएम हा मुळ तेलंगणातील हैदराबादमध्ये मूळ असलेला पक्ष, सुरुवातीला नांदेडमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न केला, नांदेड महापालिकेत 2012 मध्ये प्रवेश केला आणि पुढे2014 इम्तियाज जलील विधानसभेवर निवडून गेले. त्यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत 25 जागाही मिळवून दिल्या यानंतर 2019 मध्ये खासदाराही झाले. त्यावेळी पक्षाने राज्यातील प्रस्थापितांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले होते. मुस्लीमबहुल भागात एमआयएमने काही ठिकाणी बऱ्यापैकी बस्तान बसविले. अबू आझमी यांच्यामुळे अल्पसंख्यांकामध्ये समाजवादी पक्षाचे चांगले संघटन आहे. समाजवादी पार्टीचे दोन आमदार आहेत. आता एमआयएम ताकदीने उतरत आहे. त्यातच छत्रपती संभाजीनगरच्या मध्य मतदारसंघासह अस्लम शेख यांचा मालवणी तर जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्रा मतदारसंघावरही त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

जलील यांची निवडणूक

Advertisement

2014 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या मध्य मतदारसंघातून जलील यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. यावेळी अवघ्या काही दिवसात त्यांनी प्रदीप जैस्वाल यांचा पराभव करत विजय मिळवला होता. यानंतर 2019 मध्ये ही त्यांनी खासदाराकीची निवडणूक लढवली आणि चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात मतांचे ध्रुवीकरण झाले आणि ते पुन्हा एकदा सहज रित्या निवडून आले.

जलील यांचे मवाळ भूमिका

Advertisement

खासदार इम्तियाज जलील यांचे नातेवाईक असलेले असदुद्दीन औवेसी यांचा पक्ष तसा कट्टरपंथी आहे. त्यांची वक्तव्येदेखील तशीच असल्याचे दिसून येत असतात. मात्र, इम्तियाज जलील यांनी कधीच कट्टरपंथी भूमिका घेतली नाही, 2014 ची निवडणूक असो की 2019 ची लोकसभा त्यांनी ना हिंदुत्वावर टीका केली ना कधी प्रखरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी केवळ जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दा पुढे करत निवडणूक लढविल्याचे दिसून येते. तर छत्रपती संभाजीनगरचे नाव पुन्हा औरंगाबाद व्हावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात काही तरुणांनी औरंगजेबाचे पोस्टर झळकवले होते. यावर बोलतानाही त्यांनी ज्यांनी औरंगजेबाचे फोटो झळकावले त्यांचा माझ्याशी संबंध नाही असे म्हणत आपली मवाळ भूमिका स्पष्ट केली होती.

कदम, श्रीकांत शिंदेंशी मैत्री

Advertisement

खासदार जलील यांचे शिवसेनेच्या तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांच्यासोबत मैत्रीचे संबंध होते, 2014 ते 2019 च्या काळात कटकट गेट परिसरात मुस्लिम बहुल भागात रामदास कदम व शिवसेनेचे बॅनर लागले होते. या मागे तत्कालीन आमदार इम्तियाज जलील यांचाच पुढाकार होता अशी चर्चा होती.

तेव्हापासून कदम-जलील यांच्यात मैत्री झाल्याच्या चर्चा आहेत. जिल्हा नियोजन समितीच्याबैठकीत देखील कदमांनी जलील यांच्या मतदारसंघातील कामासाठी भरघोस निधी देत दोस्ती निभावल्याचे पुढे दिसून आले होते तर इम्तियाज जलील यांच्या खासदार चषक कार्यक्रमात कल्याणचे खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली होती, यानंतर दोघांनीही एकमेकांवर स्तुती सुमने उधळली होती यामुळे जलील यांची सर्व पक्षात आपले मैत्रीपूर्ण संबंध जपले आहेत.

Advertisement

माझे पहिले टार्गेट हे 2024 च्या निवडणुकीत पुन्हा इम्तियाज जलील यांना लोकसभेत पाठविण्याचे आहे. शहराचा विकास करणे आणि मुंबई, पुण्यात गेलेल्या तरुणांना पुन्हा शहरात यावे असे वाटले पाहिजे, शहराचा विकास व्हावा हे ध्येय असल्याचे सांगतानाच लोकांची मदत करण्याचा प्रयत्न आहे. कट्टरपंथी विचार न करता शहराचा विकासाचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे सांगतानाच निवडणूक लढवणार की नाही हे अजून ठरले नाही, केवळ पक्षात काम करत स्वत:ची ओळख तयार करतोय, असे बिलाल जलील यांनी म्हटले आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement