बायकोला नांदवायला पाठवत नसल्याचा राग: सांगलीत जावयाकडून सासऱ्यांचा खून; गुन्हा दाखल, जत तालुक्यातील घटना


सांगली36 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सांगतीलून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बायको नांदवायला पाठवत नाही म्हणून जावयाने सासऱ्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना जत तालुक्यातील दरीबडीची येथे शनिवार (14 जानेवारी) मध्यरात्री घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित फरार आहे. आप्पासो मल्लाड असे मृत सासऱ्याचे नाव आहे

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जत येथील दरीबडची येथील तेजश्री हिचे लग्न चार वर्षापूर्वी कर्नाटकच्या अथणी येथील ऐगळी गावातील सचिन रुद्राप्पा बळोळी याच्याशी झाला. लग्नानंतर काही दिवसांतच सचिन आणि तेजश्री यांच्यात वाद होऊ लागले होते. सचिन हा तेजश्रीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करत होता. त्यांच्यातील वाद कमी करण्याचा प्रयत्न तेजश्रीचे वडील आप्पासाहेब यांनी आणि गावातील लोकांनी केला. मात्र, सचिनने तिला मारहाण करणे सुरूच ठेवले होते. अखेर तेजश्री सततच्या मारणीला कंटाळून माहेरी निघून आली होती.

बायको तेजश्रीला दिली धमकी

Advertisement

दरम्यान, सचिनने तेजश्रीच्या घरी येऊन तिला घरी येण्यास सांगितले. मात्र, तिने नकर दिला. यामुळे त्याने, अथणी कोर्टात मुलगी नांदण्यास पाठवावी म्हणून केस केली आहे. तर मुलीच्या आई वडिलांनी जत कोर्टात त्यांचा घटस्फोटाकरता अर्ज केला. काही दिवसांपूर्वी सचिनने तेजश्रीला ‘तु नांदायला चल, नाही आलीस तर तुला जिवंत ठेवत नाही ‘अशी धमकी दिली होती. दरम्यान, शुक्रवारी शेतातील ऊस तोडीचे काम सुरु असल्याने तेजश्रीचेवडील वडील आप्पासो हे शेतात गेले होते. जावई सचिन हा त्याचा भाऊ मिलन रुद्राप्पा बळोळी व दोन अनोळखी व्यक्तींसह शेतात आला. त्याने आप्पासो यांचावर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. आप्पासो यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने बॅटरीच्या उजेडात तेथील नागरिकांना आरोपी दिसले. दरम्यान, या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने आप्पासाहेब यांचा मृत्यू झाला. तर आरोपी फरार झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement