बाजार समिती निवडणूक: चांदूर रेल्वेतही काँग्रेसच बिनविरोध, सभापतीपती गणेश आरेकर, उपसभापती रवींद्र देशमुख


अमरावती5 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांच्यासह माजी आमदार तथा सदर निवडणुकीचे शिल्पकार प्रा. वीरेंद्र जगताप व इतर मान्यवर.

चांदुर रेल्वे कृषी बाजार समितीची निवडणूक आज, गुरुवारी पार पडली. सभापतीपदी जिल्हा परिषदेचे माजी सभापती गणेश आरेकर तर उपसभापती रवींद्र देशमुख विजयी झाले. दर्यापुरप्रमाणेच येथेही निवडणूक अविरोध झाली. माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी यशस्वी मध्यस्थी करत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. विद्यमान आमदार प्रताप अडसड यांना या मतदारसंघात कोठेही यश खेचून आणता आले नाही. बुधवारी नांदगाव येथे झालेल्या निवडणुकीत ढेपे गटाने बाजी मारली.

Advertisement

निवडणुकीची प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप जातीने उपस्थित होते. गेल्या २८ एप्रिल रोजी कृषी बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. त्यात माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वातील काँग्रेस प्रणित सहकार पॅनलने १८ पैकी १७ जागी विजय मिळवला होता. त्यामुळे सभापती व उपसभापतीही काँग्रेसचाच होणार, हे तेव्हाच स्पष्ट झाले होते.

Advertisement

दरम्यान आज, सकाळी सभापती पदासाठी गणेश आरेकर तर उपसभापती म्हणून रवींद्र देशमुख यांचे नाव निश्चित करण्यात आले. या दोन्ही नावांना उर्वरित सर्व संचालकांनी एकमताने पसंती दर्शविली. त्यामुळे दोन्ही पदे अविरोध निवडली गेली. दोन्ही पदांसाठी एकेकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक अधिकारी प्रिती धामणे व सहायक निवडणूक अधिकारी एम. एस. मनसुटे यांनी आरेकर आणि देशमुख यांच्या नावांची अनुक्रमे सभापती व उपसभापती म्हणून अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये काँग्रेसजनांनी एकच जल्लोष केला. त्याचवेळी एकमेकांना पेढे भरवत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी संचालक सुभाष अग्रवाल, सुरेश जाधव, प्रशांत कोल्हे, प्रभाकर वाघ, हरिभाऊ गवळी, तेजस भेंडे, पूजा देशमुख, वर्षा वाघ, वसंत गाढवे, अतुल चांडक, मंगेश धावडे, राजेंद्र राजनेकर, राम वानखडे, रावसाहेब शेळके यासह काँग्रेसचे पदाधिकारी अमोल होले, प्रदीप वाघ, भानुदास गावंडे, वैभव गायकवाड, गोविंदराव देशमुख, प्रमोद देशमुख तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

—————————————-

Advertisement



Source link

Advertisement