बागेश्वर बाबांचा दरबार आता मुंबईत भरणार: एकही कार्यक्रम होऊ देणार नाही; नाना पटोले यांचा तीव्र इशारा, CM एकनाथ शिंदेंना लिहिले पत्र


मुंबई9 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

18, 19 मार्चला बागेश्वर बाबांचा दरबार मुंबईत भरणार आहे. समोरील व्यक्तीच्या मनातले आपण ओळखू शकतो, त्या व्यक्तीविषयी सगळीच माहिती सांगू शकतो, असा दावा याआधी बागेश्वर बाबांनी केला होता. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमाला तीव्र विरोध केला आहे. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही याला तीव्र असा विरोध दर्शवला आहे.

Advertisement

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांच्या मीरा रोड येथील कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. विधानभवन परिसरात नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, बागेश्वर महाराज यांचे कार्यक्रम मुंबईत होत असतील तर त्याला आमचा विरोध असणार आहे. कारण याच ढोंगी बाबाने जगात श्रेष्ठ तुकोबा महाराजांचा अपमान केला आहे.

बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमाची जाहिरात.

बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमाची जाहिरात.

Advertisement

नाना पटोलेंचे पत्र जसेच्या तसे

मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. 32
मा. मुख्यमंत्री

Advertisement

विषय- बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांच्या मीरा रोड येथील कार्यक्रमाला परवानगी देऊ नये.

महोदय,
बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांचा मीरा रोड येथे दिनांक १८ व १९ मार्च २०२३ रोजी एक कार्यक्रम होत असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचे राज्य आहे, अंधश्रद्धेला आपल्या राज्यात अजिबात थारा नाही. महाराष्ट्राने तसा कायदाही केला. तसेच या धिरेंद्र शास्त्री यांनी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा अपमान करणारे विधान केले होते. आपल्या साधु संतांचा अपमान करून लाखो वारकऱ्यांच्या भावना त्यांनी दुखावल्या आहेत.
अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या तसेच संत तुकाराम महाराज यांचा अपमान करणाऱ्या धिरेंद्र शास्त्री यांच्या वसई विरार येथील कार्यक्रमाला आपण परवानगी दिल्यास जनतेची दिशाभूल करून त्यांच्या भावनांशी, श्रद्धेशी खेळ मांडला जाऊ शकतो. अशा कार्यक्रमाला सरकारने परवानगी देऊ नये अशी विनंती आहे.
धन्यवाद !
(नाना पटोले)

Advertisement

अंधश्रद्धेच्या प्रचार प्रसाराचा आरोप

नागपुरात बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल झाला होता. दरबारात त्यांनी केलेल्या दाव्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी आक्षेप घेतला होता. बागेश्वर बाबांच्या भाषणातून अंधश्रद्धेचा प्रचार प्रसार होतोय, असा दावा श्याम मानव यांनी केला होता. मात्र पोलिसांनी बागेश्वर बाबा यांना क्लिन चिट दिली होती.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement