बांगलादेश-न्यूझीलंड कसोटी मालिका : इबादतमुळे बांगलादेशची विश्वविजेत्या न्यूझीलंडवर सरशीवेगवान गोलंदाज इबादत हुसैनने ४६ धावांत ६ बळी ही कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना बांगलादेशला विश्वविजेत्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आठ गडी राखून शानदार विजय मिळवून दिला.

Advertisement

इबादतने सामन्याच्या पाचव्या दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव १६९ धावसंख्येत संपवण्यात सिंहाचा वाटा उचलला. मग ४० धावांचे विजयी लक्ष्य बांगलादेशने दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत नवव्या स्थानावरील बांगलादेशचा हा परदेशातील सहावा कसोटी विजय ठरला. याचप्रमाणे क्रमवारीतील अव्वल पाच क्रमांकांमधील संघावरील हा पहिला विजय ठरला. जागतिक कसोटी र्अंजक्यपद विजेता न्यूझीलंड हा संघ सध्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. याचप्रमाणे न्यूझीलंडची मायदेशातील कसोटी विजयांची मालिका १७ सामन्यांनंतर खंडित झाली.

माजी व्हॉलीबॉलपटू इबादत वेगवान गोलंदाजांची स्पर्धा जिंकल्यामुळे कसोटी क्रिकेटपटू बनला. याआधीच्या १० कसोटी सामन्यांत त्याच्या खात्यावर ८१च्या सरासरीने फक्त ११ बळी जमा होते. परंतु या सामन्यात तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून  मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले.

Advertisement

The post बांगलादेश-न्यूझीलंड कसोटी मालिका : इबादतमुळे बांगलादेशची विश्वविजेत्या न्यूझीलंडवर सरशी appeared first on Loksatta.Source link

Advertisement