बलात्कार प्रकरण: साकीनाका प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, म्हणाले- ‘गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल’


Advertisement

मुंबई9 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलिस आयुक्तांशीदेखील ते बोलले आहेत.

साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशीदेखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

Advertisement

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलिस आयुक्तांशीदेखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here