बलात्काराचा गुन्हा दाखल होण्यापूर्वी तरुणाची आत्महत्या: गळफास घेण्यापूर्वी चिठ्ठीत लिहिले DNA चाचणी करा मी निर्दोष!


नाशिकएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

बहिणीकडे आलेल्या युवतीवर एका युवकाने अत्याचार केल्याने युवती गर्भवती राहिली. पीडित युवतीने घोटी पोलिसांत तक्रार दिली, परंतु ज्याच्यावर आरोप झाले त्या युवकाने गुन्हा दाखल होण्यापुर्वीच गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वावी हर्ष त्र्यंबकेश्वर येथे उघडकीस आला. यादरम्यानच तरुणाविरोधात घोटी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा आज दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

झाडाला घेतला गळफास

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्ष येथील तरुणाने गावाच्या जवळील बोरीच्या झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. प्रकाश संजय बांगरे असे या तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली.

Advertisement

काय लिहिले चिठ्ठीत?

”पीडित युवतीसोबत माझा काही संबध नसून तिची डीएनए चाचणी केल्यास सर्व उघडकीस होईल. बाबा तुम्ही आईला त्रास देऊ नका, काळजी घ्या.” असे चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.

Advertisement

मुलीने दिली होती तक्रार

इगतपुरी तालुक्यातील एका पीडित युवतीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून ती चार महिन्याची गर्भवती असल्याचे निदान झाले आहे. पीडित युवतीने मृत तरुणाविरोधात घोटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रेमसंबध निर्माण करत बलात्कार केल्याची तक्रार दिली. पीडित युवती वावी हर्ष येथे बहिणीकडे गेली होती. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष देत शारीरीक संबध ठेवले. या संबधातून गर्भवती राहिल्याची तक्रार दिली होती.

Advertisement

पोलिसांकडून तपास सुरू

युवकाने तक्रार दाखल होण्यापुर्वीच आत्महत्या केल्याने पीडित युवतीवर अत्याचार करणारा कोण याचा तपास घोटी पोलिस करत आहे. घोटी पोलिसांनी पीडित युवती आणि मृताचे रक्तनुमने घेतले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Advertisement

डीएनए अहवालानंतर होईल उलगडा

डीएनए अहवाल आल्यानंतर पीडित युवतीच्या मुलाचे वडील कोण हे स्पष्ट होणार आहे. तरुणाने गुन्हा दाखल होण्यापुर्वी आत्महत्या केल्याने या प्रकाराला वेगळेच वळण लागल्याचे बोलले जात आहे. घोटी पोलिसांकडून या गुन्ह्याचा सखोल तपास सुरु आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement