बटलरच्या शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने १५ धावांनी दिल्ली काबीज

बटलरच्या शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने १५ धावांनी दिल्ली काबीज
बटलरच्या शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने १५ धावांनी दिल्ली काबीज

राजस्थानने विजयासाठी ठेवलेल्या २२३ धावांचा पाठलाग करताना दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी प्रसिद्ध कृष्णाने फोडली. त्याने वॉर्नरला २८ धावांवर बाद केले. त्यानंतर आलेले सर्फराज खान देखील १ धावेचे भर घालून आल्या पावली परतला. इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ३४वा सामना शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने शानदार विजय मिळवला. राजस्थानने १५ धावांनी दिल्लीला पराभूत केले. राजस्थानच्या विजयात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांनी मोलाचे योगदान दिले.

पॉवर प्लेमध्ये आक्रमक फटके मारण्याऱ्या पृथ्वी शॉचा नंतर वेग मंदावला. दरम्यान १० व्या षटकात अश्विनने २७ चेंडूत ३७ धावा करणाऱ्या पृथ्वी शॉला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत दिल्लीला मोठा धक्का दिला. पृथ्वी शॉ बाद झाला त्यावेळी दिल्लीने ९९ धावांपर्यंत मजल मारली होती. सलग तिसरं शतक झळकवणाऱ्या जोस बटलरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी ३५ धावांची गरज असताना रोव्हमन पॉवेलने पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार मारत राजस्थानचा बीपी वाढवला होता. मात्र अखेर मॅकोयने शेवटचे तीन चेंडू चांगले टाकत राजस्थानला सामना जिंकून दिला. राजस्थानचे २२३ धावांचे आव्हान पार करताना दिल्लीने २० षटकात ८ बाद २०७ धावांपर्यंत मजल मारून दिली. दरम्यान, या सामन्यात देखील अंपायरिंगवरून वाद झाल्याचे दिसले. राजस्थानकडून जॉस बटलरने धडाकेबाज फलंदाजी करत ११६ धावांची शतकी खेळी केली.

Advertisement

पृथ्वी बाद झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. मात्र प्रसिद्ध कृष्णाने त्याची २४ चेंडूतील ४४ धावांची खेळी १२ व्या षटकात संपवली. पाठोपाठ युझवेंद्र चहलने अक्षर पटेलचा (१) त्रिफळा उडवत दिल्लीचा पाचवा फलंदाज माघारी धाडला.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत राजस्थान रॉयल्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २ विकेट्स गमावत २२२ धावा केल्या आणि दिल्लीला २२३ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पार करताना दिल्ली संघ ८ विकेट्स गमावत २०७ धावाच करू शकला. त्यामुळे दिल्लीला या हंगामातील चौथा पराभव पत्करावा लागला.

Advertisement