बटलरचे सहा षटकार, कोहलीचा ड्रामेबाज झेल मध्ये आरसीबीचा ४ गडी राखून विजय

बटलरचे सहा षटकार, कोहलीचा ड्रामेबाज झेल मध्ये आरसीबीचा ४ गडी राखून विजय
बटलरचे सहा षटकार, कोहलीचा ड्रामेबाज झेल मध्ये आरसीबीचा ४ गडी राखून विजय

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२२ची तेरावी लढत झाली. या सामन्यात पुन्हा एकदा राजस्थानकडून जोस बटलरने शानदार फलंदाजी प्रदर्शन केले आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. प्रत्युत्तरात सलामी जोडीच्या विकेटनंतर कोलमडलेल्या बेंगलोर संघाचे शेपूट वळवळले आणि बेंगलोरने ४ विकेट्स राखून सामना जिंकला. हा त्यांचा हंगामातील दुसरा विजय होता.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने निर्धारित २० षटकांमध्ये ३ विकेट्सच्या नुकसानावर १६९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग बेंगलोरने ६ विकेट्सच्या नुकसानावर १९.१ चेंडूमध्येच केला. दिनेश कार्तिकने पुन्हा एकदा सिद्ध करत की अजून माझ्यात दम आहे. नाबाद ४४ धावा करत सामना जिंकावला त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Advertisement

कार्तिक आणि अहमदची मॅच विनिंग भागीदारी

Advertisement

राजस्थानच्या १७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला चांगली सुरुवात मिळाली होती. कर्णधार आणि सलामीवीर फाफ डू प्लेसिस व अनुज रावत यांच्यामध्ये पहिल्या विकेटसाठी ५५ धावांनी शानदार भागीदारी झाली. डू प्लेसिस वैयक्तिक २९ तर अनुज २६ धावा करून बाद झाले. त्यानंतर मधळ्या फळीला विशेष खेळ दाखवता आला नाही. पुढे शाहबाज अहमद आणि दिनेश कार्तिकने संघाचा डाव सावरला. अहमद २६ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ४ चौकार मारत ४५ धावांवर बाद झाला.

यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने मात्र नाबाद ४४ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. हर्षल पटेलने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत ५ चेंडू शिल्लक असताना संघाला सामना जिंकून दिला.

Advertisement

बटलरची पुन्हा झुंजार खेळी

Advertisement

तत्पूर्वी राजस्थानकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर जोस बटलरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४७ चेंडू खेळताना नाबाद ७० धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने एकही चौकार न मारता ६ खणखणीत षटकार ठोकले आणि विक्रमांचे मनोरे रचले. या सामन्यादरम्यान त्याने त्याचे आयपीएलमधील १०० षटकारही पूर्ण केले. बटलरव्यतिरिक्त राजस्थानकडून शिमरॉन हेटमायर याने नाबाद ४२ धावांचे योगदान दिले. तसेच कर्णधार संजू सॅमसन ३७ धावा करून बाद झाला.

या डावात बेंगलोरच्या गोलंदाजांना केवळ ३ विकेट्स घेता आल्या. बेंगलोरकडून पावरप्लेमध्ये डेविड विलीने पहिली विकेट घेतली. त्यानंतर हर्षल पटेल वानिंदू हसरंगा यांनीही प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले.

Advertisement