बँकेत नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी!: ‘एसबीआय’ मध्ये 1673 जागा; 12 ऑक्टोबरपर्यंत करा ऑनलाईन अर्ज


औरंगाबाद2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

स्टेट बँक ऑफ इंडियात (एसबीआय) परिविक्षाधीन अधिकारीपदाच्या (पीओ) 1673 जागा भरण्यात येणार आहे. 21 सप्टेंबरला एसबीआयने यासंदर्भात संकेतस्थळावर अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार 12 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

Advertisement

इथे करा अर्ज

पुर्व परीक्षा 100 गुणांची, मुख्य परीक्षा 250 तर तोंडी मुलाखतीत 50 गुण आहेत. यात मेरिटनुसार योग्य उमेदवारांची निवड केली जाईल. sbi.co.in या संकेतस्थळावर सिलॅबस उपलब्ध आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात.

Advertisement

ऑनलाईन करा अर्ज

एसबीआयच्या देशातील विविध शाखांमध्ये आणि मुख्यालयात प्रोबेशनरी ऑफिसरपदासाठी भरती केली जाणार आहे. या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. सामाजिक आरक्षणही पाळले जाणार आहे. 1673 पैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी सर्वाधिक 648 जागा आहे. त्याखालोखाल इतर मागास वर्गासाठी 464 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 270 तर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या उमेदवारांना 160 जागा राखीव आहेत. अनुसूचित जमातीच्या 131 उमेदवारांना प्रतिनिधित्व दिले जाणार आहे.

Advertisement

अशी आहे वयोमर्यादा

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेतील समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. अर्ज करताना पदवीचे अंतिम सत्र असले तरी चालणार आहे. पण मुलाखतीच्या तारखेपर्यंत पदवी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. उमेदवाराचे वय 21 ते 30 असावे. सर्वसाधारण प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास आणि ओबीसींना 750 रूपये नोंदणी शुल्क भरावे लागेल. 22 सप्टेंबरपासूनच ऑनलाईन अर्ज करण्यास सुरूवात झाली असून 12 ऑक्टोबरची अंतिम मुदत आहे.

Advertisement

65 हजार असणार पगार

17 ते 20 डिसेंबर दरम्यान पुर्व परीक्षा घेतली जाईल. डिसेंबर किंवा जानेवारीत लेखी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी-2023 दरम्यान मुख्य परीक्षा होईल. या परीक्षेचा निकाल फेब्रुवारीतच जाहीर केला जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी मार्च-2023 दरम्यान संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 65 हजार 780 ते 67 हजार 580 दरमहा वेतन दिले जाणार आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement