फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना चापट मारणाऱ्या व्यक्तीला 18 महिन्यांचा कारावास


  Advertisement

  पॅरिस : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना एक व्यक्तीने चापट लगावली आहे. याप्रकरणी चापट मारणाऱ्या व्यक्तीला 18 महिन्यांचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दोन दिवसांपूवी एका व्यक्तीने राष्ट्रपीत मॅक्रॉन यांना चापट मारली होती.

  राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सच्या दक्षिणेकडील दौऱ्यावर होते. टॅन एल हर्मिटज शहरात ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आपल्या दौऱ्यावर असताना मॅक्रॉन तेथे उपस्थित असलेल्या लोकांशी हात मिळवण्यासाठी गेले असता एका व्यक्तीने त्यांना चापट मारली होती. या व्यक्तीना राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना चापट मारल्यानंतर त्यांच्या सुरक्षा पथकाने त्या व्यक्तीला लगेचच ताब्यात घेतलं होतं आणि मॅक्रॉन यांना तेथून दूर नेले.

  Advertisement

  Advertisement

  या व्हिडीओमध्ये दिसतंय की हिरव्या रंगाचा टी-शर्ट आणि मास्क घातलेल्या इसमाने राष्ट्राध्यक्षासमोर हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन जवळ येताच त्याने त्यांना चापट लगावली. या घटनेनंतर मॅक्रॉन यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.

  या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी फ्रान्सच्या संसदेत म्हटलं की, देशाच्या प्रमुखांद्वारे लोकशाहीला लक्ष्य केलं गेलं आहे. लोकशाहीत चर्चा, टीका, वादाविवाद, वैचारिक मदभेद यांना जागा असते. मात्र लोकशाहीत कोणत्याही हिंसेला जागा नाही.

  Advertisement  Source link

  Advertisement

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here