नाशिक28 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
महापालिकेच्या वतीने सिटीलिंकच्या माध्यमातून शहरी भागात बससेवा सुरु करण्यात आली आहे. शहरातील विविध मार्गावर सिटीलिंकच्या 200 हुन अधिक बसेस धावत असून त्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. मात्र, विनातिकीट प्रवासाचे प्रकार वाढले असून याविराेधात सिटीलिंकने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या साडेतीन महिन्यात सिटीलिंकने अशा 807 विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
शहरी प्रवासी वाहतुकीत ताेटा हाेत असल्याचे कारण देत एसटी महामंडळाच्या वतीने शहरी भागात प्रवासी सेवा देण्यास नकार देण्यात आला हाेता. याच पार्श्वभुमीवर पालिकेच्या वतीने नाशिक महानगर परिवहन महामंडळ स्थापन करुन सिटीलिंक बससेवा सुरु केली आहे.अत्याधुनिक सुविधा असलेल्या बसेस शहरातील विविध भागात धावत असल्याने सुरुवातीपासून या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. यात विद्यार्थी, महिलासह कामगारांची संख्या देखील लक्षणीय आहे.
मात्र बसमधील गर्दीचा फायदा घेत काही प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे समाेर आले हाेते. याप्रकाराला आळा घालण्यासाठी सिटीलिंकच्या वतीने तपासणी पथकाची देखील निर्मीती करण्यात आली हाेती.या पथकाकडून विविध मार्गावर प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यात ऑक्टोबर ते जानेवारी 15 या कालावधीत तब्बल 807 विनातिकीट प्रवाशावर कारवाई करत दंडात्मक कारवाई केली.
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून प्रतिव्यक्ती 364 रुपये अधिक जीएसटी व प्रवास मार्गाचे पुर्ण तिकीटाप्रमाणे पैसे अशी कारवाई केली आहे. दरम्यान कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी तिकीट घेवूनच प्रवास करावा असे सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
असे आढळून आले विनातिकीट प्रवासी
- ऑक्टाेबर- 364 प्रवासी
- नाेव्हेंबर- 245
- डिसेंबर-245
- 1 ते 15 जानेवारी – 122
सिटीलिंकच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध मार्गावर बसेस सुरु करण्यात आलेल्या आहेत. या सुविधेचा लाभ घ्यावा, मात्र तिकीट काढूनच प्रवास करावा. – मिलिंद बंड, व्यवस्थापक, सिटीलिंक