फसवणूक: सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकास साडेसात लाख रुपयांचा गंडा; पुण्यात कंपनीच्या संस्थापकांसह संचालकांवर गुन्हा दाखल


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Retired Police Inspector Was Paid Seven And A Half Lakh Rupees; A Case Has Been Registered Against The Founders And Directors Of The Company In Pune

पुणे16 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

एका सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकास एका कंपनीने ज्येष्ठ नागरिकांना कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा व्याज मिळवून देण्याचे अमिष दाखवून साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आराेपींवर चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

Advertisement

संबंधित तक्रारीनुसार रेहान एंटरप्रायजेस कंपनीचे संस्थापक महादेव जाधव व इतर संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यााबाबत राजेंद्र केशव आळेकर (वय-61,रा आनंदनगर, पुणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार पाच एप्रिल 2022 ते आतापर्यंत बाणेर येथे घडलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान एंटरप्रायजेस कंपनीचे संचालक महादेव जाधव व इतर संचालकांनी तक्रारदार यांंना तसेच त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर अनेक मध्यमवर्गीय, गरीब व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कंपनीत गुंतवणुक केल्यासअल्पावधीत चांगल्याप्रकारे परतावा मिळेल असे अमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यामुळे तक्रारदार यांनी कंपनीत साडेसात लाख रुपयांची गुंतवणुक केली असता, त्यांना काेणताही परताना न देता तसेच त्यांची रक्कम परत न करता फसवणुक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आणखी इतर गुंतवणुकदारांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक एस ताेडकरी पुढील तपास करत आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षकाची आर्थिक फसवणूक

Advertisement

दिलीप हनुमंत माने (वय-56,रा.औंध,पुणे) हे नागरी हक्क संरक्षण पनवेल येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून सध्या कार्यरत आहे. त्यांची त्यांचे सहकारी किशाेर चाैधरी यांचे मार्फेत तन्मय मरेश जाधव (रा.हडपसर,पुणे) यांच्याशी झाली हाेती, जाधव याने तक्रारदार यांना बँक गॅरंटी लाेन वार्षिक तीन ते चार टक्के दराने काढून देताे असे सांगितले, त्याकरिता माने यांच्याकडून तीन लाख रुपये आरटीजीएसद्वारे घेवून काेणतेही लाेन न करता, पैसे आज, उद्या देताे असे सांगुन अद्याप पर्यंत न देता फसवणुक केली आहे. याबाबत आराेपी विराेधात खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.



Source link

Advertisement