फसवणूक: रेल्वे तिकीट निरीक्षकाला तीन लाखांचा गंडा; चॅनल सबक्रीप्शन करुन ज्यादा परतावा देण्याचे दाखविले आमिष


जळगाव13 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

यु ट्युब चॅनल सबक्राईब करा, बिटकॉईन खरेदी करा यातून जास्तीचा परतावा देण्याचे आमिष देत तिकीट निरीक्षकाला 2 लाख 94 हजार 500 रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 8ते 12 मे अशा अवघ्या पाच दिवसात भामट्यांनी ही फसवणूक केली.

Advertisement

मनोजकुमार सुनहरीलाल राज (वय 45, रा. श्रीश्री रेसीडेन्सी, भोईटेनगर) यांची फसवणूक झाली आहे. राज हे मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागात तिकीट निरीक्षक म्हणून नोकरीस आहेत.

घटना अशी की, 8 मे रोजी राज यांना मोबाईलवर एक यु ट्युब चॅनल सबस्क्राईब केल्यास प्रत्येक सबक्राईबला 50 रुपये मिळतील असा मॅसेज आला. या आमिषाला बळी पडल्यानंंतर राज यांनी सबक्राईब करण्यास सुरूवात केली. सुरूवातीला त्यांना तीन सबक्राईबचे 150 रुपये भामट्यांनी पाठवले. यांनतर वेगवेगळ्या टेलिग्राम आयडींवर सबक्राईब करण्याच्या सुचना त्यांना येऊ लागल्या. दररोज येत असलेल्या सुचनांप्रमाणे राज सबक्राईब करीत होते. त्यापोटी त्यांच्या बँक खात्यात जास्तीचे पैसे येऊ लागले. यानंतर भामट्यांनी त्यांना बिटकॉईनची बेवसाईट दिली, त्यावर रजिस्ट्रेशन करण्याच्या सुचना दिल्या. जास्तीचे पैसे मिळतील असे आमीष दिले.

Advertisement

त्यानुसार राज यांनी पुढील पाच दिवसात वेळोवेळी स्वत:सह पत्नी, मित्रांच्या बँक खात्यातून भामट्यांना 2 लाख 94 हजार 500 रुपये पाठवले. सर्व टास्कपूर्ण केल्यानंतर वाढीव परतावा मागण्यासाठी त्यांनी संबधित मोबाईल क्रमांक, लिंकवर मॅसेज करुन पैशांची मागणी केली. यावेळी त्यांना पुन्हा 4 लाख रुपये पाठवण्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर राज यांनी शहर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड तपास करीत आहेत.



Source link

Advertisement