फसवणूक: बोगस कागदपत्र दाखवत कर्ज मंजूर करून घेत स्टेट बँकेला 86 लाखांचा गंडा


नाशिक40 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

बोगस कागदपत्र दाखवून कर्ज मंजूर करून घेत स्टेट बँकेची 86 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना नाशिक जिल्ह्यात उघड झाली आहे. गृह कर्ज मंजूर करून घेत 86 लाख रुपये खाती वर्ग करत स्टेट बँकेच्या केंद्रीय कार्यालयात हा प्रकार उघडकीस आला.

Advertisement

याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

नक्की प्रकरण काय?

Advertisement

पोलिसांनी दिलेली माहिती आणि बँक व्यावस्थापक प्रकाश सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी २०२१ मध्ये संशयित विवेक उगले याने बँकेत गृह कर्ज मिळण्याकरीता ५ कर्जदारांची फाईल दिली होती. यासोबत बांधकाम व्यावसायीकाचे साठेखत दिले होते. तसेच कर्जदारांच्या वेतन स्लीप जोडल्या होत्या. बँकेकडून ५ ग्राहकांचे ८६ लाखांचे गृहकर्ज मंजुर करण्यात आले होते.

दोन वर्षापासून कर्जदार अजय संजय अाठवले, रोशनी जयस्वार, संतोष जयस्वार, राजू कलमपट्टी, अश्विन साळवे, किरण अाठवले कर्जाचे हफ्ते भरत नसल्याने बँकेकडून कर्ज भरण्यासाठी नोटीस पाठवण्यात अाली होती. नोटीसीला उत्तर न दिल्याने बँकेकडून कर्जाचे कागदपत्र पाहिले असता वेतन स्लीप, राहण्याचे पत्ते खोट असल्याचे निदर्शनास अाले. संबधित बिल्डरकडे चौकशी केली असता त्यांच्या नावाचे बिझनेस बँक अाणि शिरपुर बँकेत बोगस खाते उघडल्याचे समजले. अार्थिक गुन्हे शाखेचे निरिक्षक एस.एम पीसे तपास करत अाहे.

Advertisement

अशी केली फसवणूक

मास्टर माईंड विवेक उगले याने गृह कर्ज मंजुर होत नाही अशा व्यक्तींना हेरत वेतन स्लीप मध्ये बदल करत बोगस वेतन स्लीप तयार केल्या. शहा नामक बिल्डचे साठेखत जोडून बोगस कागदपत्राच्या अधारे कर्ज मंजुर करुन बोगस बँक खाते उघडून सर्व रक्कम संशयिताने खात्यात वर्ग करुन घेतली.

Advertisement

फसवणूकीची व्याप्ती वाढणार

संशयिताने बोगस कागदपत्राच्या अधारे गृह कर्ज मंजुर केले. कर्जदारांच्या वेतन स्लीप मध्ये फेरफार केली. बांधकाम व्यावसायीकाचे नाव वापर बोगस खाते उघडले. अशा प्रकारे कुणाची फसवणूक झाली असल्याने अार्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधावा. एस.एम.पिसे निरिक्षक

AdvertisementSource link

Advertisement