फसवणूक: ‘जीवनसाथी डॉटकॉम’वर झाली ओळख, परदेशातून महागडी गिफ्ट पाठविण्याच्या अमिषाने महिलेस आठ लाखांचा गंडा


पुणे14 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

‘जीवनसाथी डॉटकॉम’ या लग्नविषयक बेबसाईटच्या माध्यमातून ओळख निर्माण करून परदेशात काम करत असलेल्या एका तरुणाने 28 वर्षीय तरूणीची परदेशातून महागडी गिफ्ट पाठवण्याचे आमिष देत आठ लाखांची फसवणूक केली.

Advertisement

विमानतळावर संंबधित गिफ्ट कस्टम पथकाने पकडल्याचे सांगून ते साेडविण्यासाठी वेगवेगळया बँक खात्यावर आठ लाख रुपये घेऊन तरुणीला गंडा घातल्याचे उघड झाले.

काय आहे प्रकरण?

Advertisement

पाेलीसांनी दिेलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीची आरोपी निखील जाेशी साेबत जीवनसाथी डाॅटकाॅम या वेबसाईटवर ओळख झाली. जाेशी याने फाेन करुन व्हाॅटसअप काॅल करुन तिला लग्न करण्याचे अमिष दाखवले व तिचा विश्वास संपादित केला. त्यानंतर तरुणीला तुला साेने, आयफाेन व परदेशी चलन इंगलंडहून बॅग मध्ये पार्सल पाठवून देताे असे सांगितले.

त्यानुसार पार्सल पाठवले असून ते विमानतळावर पकडल्याचे आरोपींनी सांगत, कस्टम डयुटी, परदेशी चलन कन्वर्ट व भारतीय कर करण्यास एकूण आठ लाख रुपये ऑनलाईन पध्दतीने घेऊन फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पाेलीस निरीक्षक (गुन्हे) एस तांबे पुढील तपास करत आहे.

Advertisement

महिलेची साडेसहा लाखांची ऑनलाईन फसवणुक

हिंजवडी परिसरात म्हाळुंगे येथे राहणाऱ्या एका महिलेच्या माेबाईल क्रमांकावर अनाेळखी इसमाने फाेन करुन, त्यांची व्यैक्तिक माहिती विचारुन घेत महिलेस ऑनलाईनपर्सनलप्री अप्रुवल लाेन हे दाेन लाख रुपयांपर्यंत घेतले. त्यानंतर महिलेच्या बँक खात्यातून आरोपीने सहा लाख ७३ हजार रुपये परस्पर काढून घेतले आहे.

Advertisement

महिलेच्या बँक खात्यातून एअर पे या पेमेंट गेटवे मार्फेतीने आरोपीने पैसे काढून घेतल्याचा मेसेज महिलेच्या माेबाईलवर आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत अज्ञात आरोपीविराेधात हिंजवडी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.



Source link

Advertisement