फटकारे: नवे संसद भवन देशाची ताकद, मोदींना विरोध करण्याचा ज्वर चढला – देवेंद्र फडणवीसांची कडाडून टीका


मुंबई3 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नवी संसद भवन ही देशाची ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याचा ज्वर चढला आहे. त्यामुळे नव्या संसद भवनच्या उद्घाटनाला विरोध होत आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आज लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.

Advertisement

मोदींनी करून दाखवले

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”आम्ही नवीन संसद भवन बांधू, अशी ओरड सर्वचजण करत होते. कोणालाही नवीन घर बांधता आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसद भवन उभारून ते करुन दाखलवे. विरोधकांचा लोकशाहीच्या मंदिरावर विश्वास नाही. जे लोक लोकशाहीला मानत नाही, ते लोकशाहीवर बोलत आहेत.”

Advertisement

सापनाथ नागनाथ सब साथ

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”सापनाथ, नागनाथ सब साथ आओ, अशी विरोधकांची अवस्था झाली आहे. केजरीवाल-ठाकरे यांच्या भेटीवरुन भाजपची ताकद दिसते. इंदिरा गांधी यांनी संसदेचं उद्घाटन केले होते ते लोकशाही विरोधी होतं का?”

Advertisement

​​​​​​​जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात

जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर ​​​​​​​जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. बैठकीत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला असून जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Advertisement

शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्यासाठी सोलर योजना

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळवण्यासाठी प्रयत्नशील

Advertisement

गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेला गतीSource link

Advertisement