प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटणची गुजरातवर मातबेंगळूरु : युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या पुणेरी पलटणने बुधवारी प्रो कबड्डी लीगमध्ये अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेल्या गुजरात जायंट्सला ३३-२६ असे नामोहरम केले.

Advertisement

मोहित गोयतने चढायांचे १० गुण मिळवत पुण्याच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला, तर अस्लम इनामदारने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. गुजरातकडून अजय कुमार (१० गुण) आणि राकेश सनग्रोया (८ गुण) यांनी उत्तम खेळ केला.

दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्लीने तेलुगू टायटन्सवर ३६-३५ अशी सरशी साधली. दिल्लीकडून नवीन कुमारने २५ गुण मिळवत चतुरस्रा चढाया केल्या. तेलुगू टायटन्सकडून रजनीश दलालने चढायांचे २० गुण मिळवत लक्ष वेधले.

Advertisement

The post प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटणची गुजरातवर मात appeared first on Loksatta.Source link

Advertisement