प्रीमियर लीग फुटबॉल : मँचेस्टर सिटी-वेस्ट हॅममध्ये बरोबरीमँचेस्टर : रियाद मेहारेझला निर्णायक क्षणी गोल करण्यात अपयश आल्याने मँचेस्टर सिटीला प्रीमियर लीग फुटबॉलमधील वेस्ट हॅमविरुद्धच्या सामन्यात २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

Advertisement

या सामन्यात वेस्ट हॅमचे दोन्ही गोल जॅरेड बोवेनने (२४वे आणि ४५वे मिनिट) झळकावले, तर सिटीकडून जॅक ग्रिलिश (४९वे मि.) आणि व्लादिमिर कुफाल (६९वे मि., स्वयंगोल) यांनी गोल केले. तसेच ८६व्या मिनिटाला सिटीला पेनल्टी मिळाली. मात्र यावर महारेझने मारलेला फटका प्रतिस्पर्धी संघाचा गोलरक्षक ल्युकास फॅबियान्स्कीने रोखला. त्यामुळे सामना बरोबरीत राहिला आणि दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाला. या बरोबरीमुळे लिव्हरपूलने जेतेपदाच्या शर्यतीतील आपले आव्हान कायम ठेवले आहे.Source link

Advertisement