प्रीमियर लीग फुटबॉल : चेल्सीने लिव्हरपूलला बरोबरीत रोखलेएपी, लंडन : चेल्सी आणि लिव्हरपूल या बलाढय़ संघांमधील प्रीमियर लीग फुटबॉलचा सामना २-२ असा बरोबरीत संपला. चेल्सीचे प्रशिक्षक थॉमस टूशेल यांनी आघाडीपटू रोमेलू लुकाकूला संघातून वगळले. मात्र, चेल्सीने लिव्हरपूलला उत्तम लढत दिली.

Advertisement

साडिओ माने (नववे मिनिट) आणि मोहम्मद सलाह (२६वे मि.) यांच्या गोलमुळे लिव्हरपूलला २-० अशी आघाडी मिळाली. त्यानंतर चेल्सीने खेळात सुधारणा करताना लिव्हरपूलच्या बचाव फळीवर सातत्याने दडपण टाकले. मध्यंतरापूर्वी माटेओ कोव्हाचिच (४२वे मि.) आणि ख्रिस्टियन पुलिसिच (४५वे मि.) यांनी गोल करत चेल्सीला २-२ अशी बरोबरी साधून दिली. उत्तरार्धात दोन्ही संघांना गोल न करता आल्याने हा सामना बरोबरीतच सुटला.

या निकालानंतर प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत चेल्सी (२१ सामन्यांत ४३ गुण) दुसऱ्या, तर लिव्हरपूल (२० सामन्यांत ४२ गुण) तिसऱ्या स्थानावर आहे.

Advertisement

The post प्रीमियर लीग फुटबॉल : चेल्सीने लिव्हरपूलला बरोबरीत रोखले appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement