प्रागतिक चळवळीचा‎ वारसा: मुस्लिम समाजाची संवेदना‎ मांडणारे साहित्य संमेलन‎


औरंगाबादएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

२८ आणि २९ जानेवारी २०२३ ला‎ नाशिक मध्ये ९ वे अखिल भारतीय‎ मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे‎ आयोजन करण्यात आले आहे.‎ बरोबर २२ वर्षांपूर्वी नाशिक शहरात‎ सहाव्या अ. भा. मुस्लिम मराठी‎ साहित्य संमेलन पार पडले हाेते.‎ मुस्लीम मराठी साहित्य परिषदेचे‎ संस्थापक, विचारवंत प्रा. फक्रुद्दीन‎ बेन्नूर आणि लेखक व विचारवंत‎ विलास सोनवणे हे दोघेही जग सोडून‎ गेलेत. परंतु प्रागतिक चळवळीचा‎ वारसा ते सोपवून गेल्यामुळेच या‎ संमेलनाचे आयोजन करणे शक्य‎ झाले आहे.‎ दलित, आदिवासी व ग्रामीण साहित्य‎ संमेलनातील जाणीवा घेऊनच‎ मुस्लीम मराठी साहित्य चळवळीचा‎ जन्म झाला. हे संमेलन मुस्लिम‎ समाजाची संवेदना मांडणारी‎ चळवळ आहे, ही भूमिका प्रा. बेन्नूर‎ आणि विलास सोनावणे आग्रहाने‎ मांडत. प्रा. बेन्नूर त्यांच्या ‘भारतीय‎ मुसलमानांची समाजरचना आणि‎ मानसिकता’ या पुस्तकात नोंदवतात‎ की, सुफीचे मुख्य १४ संप्रदाय आहेत.‎ त्यापैकी नक्शबंदी, कादारीया,‎ चीस्तीया, सुऱ्हावर्दीया, जुनैदिया हे‎ प्रमुख संप्रदाय आहेत.‎

Advertisement

जातिव्यवस्थेच्या जाचक कायद्यांना‎ झुगारण्याची प्रेरणा सुफी संतांनी‎ दिली. पण तेव्हाही ज्या जाती‎ उत्पादन व्यवस्थेत महत्त्वाची‎ भूमिका पार पाडत होत्या आणि त्या‎ येवढा मोठा निर्णय घेण्यासाठी सक्षम‎ होत्या त्यांनी तेंव्हा इस्लाम‎ स्वीकारला. परंतु भारतीय‎ समाजव्यवस्थेचा भाग म्हणून त्या‎ कित्येक वर्षे तशाच राहिल्या आणि‎ आहेत. मुस्लिम समाजात याला‎ बिरादरी म्हटले जाते. हेच वास्तव‎ मंडल आयोग‎ अंमलबजावणीसाठीच्या‎ चळवळीतून समोर आले. त्यामुळेच‎ मुस्लिम हे याच समाजव्यवस्थेचा‎ एक भाग आहे, हे सिद्ध करता आले.‎ आजच्या परिस्थितीत मराठी‎ मुस्लिम म्हणून जगतांना जे भोगावे‎ लागते त्या वेदनेचे नाते दलित,‎ आदिवासी व ग्रामीण साहित्यातून‎ आलेल्या वेदनेशी घट्ट असल्याने‎ अशी साहित्य संमेलने होणे‎ महत्त्वाचे आहे.‎ – विक्रम गायकवाड , येवला‎

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement