प्रशासकीय: ड्रेनेज लाईन सफाईच्या प्रात्यक्षिकात अत्याधुनिक रोबोटिक मशीन नापास; अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून द्या – मनपा आयुक्त


छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मंगळवारी दुपारी बारा वाजता सिडको एन वन येथे अत्याधुनिक रोबोटिक मशीनद्वारे चेंबर मधील मलबा काढण्याचे प्रात्यक्षिक पार पडले. यामध्ये रोबोटिक मशीनद्वारे अल्प मलबा काढण्यात आला. लांबचा मलबा काढण्यात मशीन अपयशी ठरली. अशा मशीन तर आमच्याकडे सध्या उपलब्ध आहेत. आम्हाला एक ते दुसऱ्या चेंबरपर्यंत जाम झालेला मलबा क्रॅश करून तो वेगाने काढून ड्रेनेज लाईन साफसफाई करता येईल, अशा अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून द्यावात, असे मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

Advertisement

शहर लोकसंख्या व मालमत्ता वेगाने वाढ होत चालली आहे. त्या तुलनेत घाणपाणी वाहून जाण्यासाठी टाकलेल्या ड्रेनेज लाईन अपुऱ्या पडत आहेत. परिणामी चेंबर वारंवार चोकअप होतात. यामध्ये एक ते दुसऱ्या चेंबरपर्यंत मलबा जाम होतो. तर कधी घाण पाण्याचे निसरण: बरोबर होत नसल्याने ते ओव्हरफ्लो होऊन रस्त्याने घाण पाणी वाहते. दुर्गंधी सुटून सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते. हि समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मनपा नागरिकांच्या तक्रारीची त्वरीत दखल घेत नाही. परिणामी मजुरांना जास्तीचे पैसे देऊन ड्रेनेज लाईन सफाई करण्यात येते. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत आहे. ८ मे रोजी तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तसेच यात नाहक बळी जात आहे. या समस्यावर मात करण्यासाठी मनपाकडे अत्याधुनिक मशीनचा अभाव आहे. याबाबत दैनिक दिव्य मराठीने १० मे रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्याची मनपा प्रशासनाने दखल घेऊन अत्याधुनिक रोबोटिक मशीन मागवल्या आहेत. पण त्या मशीन ड्रेनेज लाइनच्या चेंबरमध्ये प्रत्यक्षात काम कसे करतात? याबाबत २३ मे रोजी मनपा आयुक्त श्रीकांत यांनी सिडको एन वनमध्ये प्रात्यक्षिक घेतले असता, यामध्ये मशीनची कार्यक्षमता मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले.Source link

Advertisement