प्रदूषणाचा गंभीर प्रश्न: देशाच्या राजधानीचे हे हाल.. जगाला काय संदेश मिळेल : सुप्रीम कोर्ट


Advertisement

नवी दिल्ली9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • ‘प्रदूषणाचा स्तर 200 हून कमी झाल्यास निर्बंध हटवू शकता’

एनसीआरमधील हवेतील प्रदूषणावर सर्वाेच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड व न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठाने केंद्र सरकारला फटकारले. हवामान बिघडले की उपाययाेजना केल्या जातात. हे उपाय प्रदूषण राेखण्याच्या आधी करायला हवे व ते सांख्यिकीय माॅडेलवर आधारित असले पाहिजेत. परंतु राष्ट्रीय राजधानीतील प्रदूषणाची विषारी पातळी जगासमाेर देशाची नकारात्मक प्रतिमा मांडत आहे. देशाच्या राजधानीचे हे हाल.. मग कल्पना करा, आपण जगाला यातून काय संदेश देत आहाेत? अशा शब्दांत न्यायालयाने ताशेरे आेढले. दिल्लीत बिघडलेली हवेची गुणवत्ता नियंत्रित करण्यासाठी तत्काळ उपाय करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत काेर्टाने केंद्र व हवेतील गुणवत्ता व्यवस्थापनासाठी स्थापन आयाेगाने सल्ला दिला आहे.

Advertisement

विविध हवामानातील हवेच्या पॅटर्नचा अंदाज व वैज्ञानिक माॅडेल याच्या आधारे आधीच उपाय केले पाहिजेत.साॅलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला माहिती दिली. दिल्लीचा हवेतील गुणवत्तेचा निर्देशांक बुधवारी सकाळी २९० हाेता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांगला आहे. आधी ताे ४०३ हाेता. त्यावर सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांत प्रदूषणात घट झाली. त्याचे श्रेय हवेला जाते. हे तर ‘ईश्वरी कार्य’ आहे. परंतु सायंकाळपर्यंत हवा खेळणे बंद होईल मग राजधानी प्रदूषणाच्या दयेवर अवलंबून असेल. हवेमुळे आपण वाचलो. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार सायंकाळपर्यंत स्थिती गंभीर होऊ शकते. आता हवेचा वेग २ ते ३ किमी आहे. सायंकाळी शून्यावर येईल. पण विशेष काही सुधारणा झाली नसल्याबद्दल सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली.

सरन्यायाधीश म्हणाले, तुम्ही २९० सांगत आहात. परंतु आता आम्ही फाेनवर एक्यूआय पाहिला. ताे ३१८ दिसला. हा आकडा पुन्हा गंभीर हाेऊ शकताे. आम्ही दिलेल्या निर्देशानुसार उपाय केला जावा. पीठ या प्रकरणाचा निपटारा करत नाही. आम्ही निगराणी सुरूच ठेवू. २९ नाेव्हेंबर राेजी आम्ही पुन्हा सुनावणी करू. पातळी २०० किंवा काहीशी खाली आल्यास तुम्ही निर्बंध हटवू शकता.

Advertisement

शिफारस : वैज्ञानिक माॅडेलवर आधारित उपाय करा
केंद्र सरकार व हवेची गुणवत्तेसंबंधी आयाेगाने दिलेल्या सल्ल्यानुसार विविध हंगामातील हवेचा पॅटर्न लक्षात घेऊन वैज्ञानिक माॅडेलच्या आधारे पूर्वनियाेजित उपायांवर भर द्यावा. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, तुमच्याकडे पुढील सात दिवसांतील हवेचा पॅॅटर्न आहे. तुम्हाला हवेच्या दिशेनुसार उपाय करावे लागतील. तुम्ही काय पावले टाकावीत आणि सात दिवसांत या उपायांचा काय परिणाम हाेईल? त्याचा अभ्यास काेणी करावा ? या गाेष्टी विज्ञानाधारित असाव्यात.

शाळा-महाविद्यालयात २९ नाेव्हेंबरपासून वर्ग सुरू
दिल्लीत आता शाळा तसेच महाविद्यालयात २९ नाेव्हेंबरपासून वर्ग सुरू हाेतील. सरकारी कार्यालये साेमवारपासून सुरू हाेतील. कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहनांतून प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्यासाठी विशेष बसची व्यवस्था केली जाईल. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाेबत २७ नाेव्हेंबरपासून केवळ सीएनजी व इलेक्ट्रिक वाहनांना दिल्लीत प्रवेश मिळेल. इतर वाहनांना ३ डिसेंबरपर्यंत बंदी असेल. दिल्ली सरकारने हवेच्या गुणवत्तेत सुधारणा व कामगारांना हाेणाऱ्या गैरसाेयीचा विचार करून बांधकाम क्षेत्रातील निर्बंध साेमवारपासून हटवण्यात आले हाेते. याआधी १३ नाेव्हेंबर राेजी हवेतील प्रदूषण वाढल्यानंतर शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या हाेत्या.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here