औरंगाबादएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
संतोष देशमुख । छत्रपती संभाजीनगर। मंगळवारी शहराच्या मध्यवर्ती आगारात पर्यावरणपुरक पहिली वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे. १८ मे पासून छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्गावर पहिली ई बस धावणार आहे. तसेच आणखी चार बस दाखल होतील. म्हणजेच पहिल्या टप्प्यात एकुण पाच ई बस मिळाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना कडकड धडधड आवाजापासून सुटका व ध्वनी व वायू प्रदुषणमुक्त बसेवेच्या आनंद घेता येणार आहे.
पेट्रोल, डिझेल टंचाईवर मात करणे, पर्यावरण पुरक धोरण राबवणे आणि यावरील खर्चावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने देशभर ई धोरण जाहीर केले आहे. त्या अंतर्गत ई वाहन, ई बससेवेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. महाराष्ट्रात १ जून २०२२ रोजी पुणे नगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक बस सुरू झाली. टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर विधिमंडळात ई बसेससाठी विशेष तरतूद करण्यात आली होती. नवीन वर्षात सर्व आगारात ई बस देण्याचे पूर्व नियोजन करण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर एसटी विभागाला पहिल्या टप्प्यात पाच बस मिळणार असून त्यापैकी पहिली शिवाई ई बस १६ मे रोजी दुपारी दाखल झाली आहे. आणखी चार बस दोन दिवसांत मिळणे अपेक्षित आहे. अशी माहिती विभाग नियंत्रक सुनील क्षीरसागर यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.
ई वाहनांना मुबलक वीज
तेलाचे साठे अटत चालले आहेत. त्यामुळे संपूर्ण जग आज सीएनजी, एलपीजी, ई वाहनांचा पुरस्कार करत आहे. गॅस उत्पादनासाठीचे स्राेत साधन संपत्ती आणि सौर ऊर्जा, पारंपरिक ऊर्जा मुबलक प्रमाणात आहे. पेट्रोल डिझेलच्या तुलनेत विजेचे दरही ग्राहकांच्या आवाक्यात आहेत. त्यामुळे खर्चात बचत व राष्ट्रीय संपतीचा विनयोग योग्य पद्धतीने करून घेण्यासाठी, इंधन व मेन्टन्स खर्चात बचत व पर्यावरण संरक्षणासाठी ई वाहन उपयुक्त ठरत असल्याने ग्राहकांचा कल पर्यावरणपुरक वाहनांकडे वाढू लागला आहे.
ई बसचे वैशिष्ट्य
वातानुकूलित बस आहे. मोबाइल चार्किंगची व्यवस्था आहे. रिडिंग लँम्प आहे. ४५ प्रवासी आसान क्षमत आहे. भाडे शिवशाही प्रमाणेच निश्चित केले आहे. पेट्रोल डिझेलप्रमाणेच ई बस वेगाने धावणार. आरमदायी प्रवासासाठी पुशबॅकसिट व्यवस्था आहे. असे विविध सेवासुविधा देण्यात आल्या आहेत.
खासगीकरण
एसटी महामंडळाने राज्य सरकारच्या ध्यधोरणानुसार ई बसेससाठी खासगी धोरणाचा पुरस्कार केला आहे. भाडेतत्वावर राज्यात सर्वच ठिकाणी ई बस दाखल होत आहेत. यामुळे राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.