प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी: आगामी पाच दिवस थंडी होणार कमी, नागरिकांना करावा लागणार उन्हाच्या तीव्रतेचा सामना


नाशिक7 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राज्यातील मुंबई, रत्नागिरीस सिंधुदूर्ग, जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा आणि औरंगाबाद येथे दोन दिवसांपुर्वी कडाक्याच्या थंडीचा नागरिकांना सामना करावा लागला. मात्र आगामी पाच दिवस म्हणून 25 जानेवारीपर्यंत किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होवून थंडीचा जोर कमी होणार आहे. तसेच स्वच्छ व निरभ्र आकाशासह स्वच्छ सुर्यप्रकाशामुळे कमाल तापमानात देखील वाढ होणार असल्याने राज्यातील नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागणार असल्याचे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

Advertisement

मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, धुळे, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद जिल्ह्यात गत आठवड्यात किमान तापमानात घट झाल्याने नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत होता.मात्र आता येत्या पुढील 5 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात त्या त्या ठिकाणच्या पहाटेच्या सरासरी किमान तापमानात हळूहळू साधारणपणे 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होणार असल्याने थंडी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच निरभ्र आकाश व स्वच्छ सूर्यप्रकाशातून दुपारच्या कमाल तापमानातही सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सीअसने झालेल्या वाढीमुळे महाराष्ट्रात अगोदरच ऊबदारपणा जाणवत होता, तो तसाच अजुन पुढील 5 दिवस टिकून रहाणार आहे. तर उत्तर भारतात पावसाळी ढगाप्रमाणे एकामागोमाग पळणाऱ्या पण वेगवेगळ्या उंचीवरून 2 ते 3 दिवसाच्या अंतरानेपश्चिमी झंजावातामुळे उत्तरे भारतात सध्या पाऊस, बर्फ, धुके,थंडीचा कडाका हा जाणवत आहे. तसेच 19 ते 26 जानेवारी दरम्यान दोन झंजावाताचा परिणाम उत्तर भारतात जाणवणार आहे. त्यामुळे उत्तरेतील काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही आहे. मात्र महाराष्ट्रात जमिनीपासून हवेच्या अधिक उंच जाडीत, अस्तित्वात असलेला उच्च दाबामुळे आणि घड्याळ काट्याच्या दिशेने वाहणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्या(अँटीसायक्लोनिक विंड) मुळे उत्तरेकडून महाराष्ट्राकडे येणाऱ्या थंडीला रोध तयार होत असल्याने कडाक्याची थंडी अजुनही जाणवू देत नाही.तसेच भविष्यात थंडीच्या कडाक्याची आवर्तने येण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

असे होते राज्यातील किमान तापमान

Advertisement

नाशिक 11.0, औरंगाबाद 11.6, पुणे 12.0, सातारा 13.0, बारामती 13.1, महाबळेश्वर 14.1, डहाणू 14.6, जळगाव 15.8,

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement