पुणे16 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (गुरुवारी) दुपारी 2 वाजता ऑनलाईन स्वरुपात जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य बोर्डाकडून बुधवारी येथे देण्यात आली.
अन्य शिक्षण मंडळांचे बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाल्यावर राज्यभरातील लक्षावधी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना राज्य बोर्डाच्या बारावीच्या निकालाची प्रतीक्षा होती. मे महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होईल, अशी माहिती सांगितली जात होती. मात्र, मे महिन्याच्या अगदी अखेरीऐवजी राज्य बोर्डाने 25 मे रोजी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करून सुखद धक्का दिला आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी आणि मार्च 2023 दरम्यान इयत्ता बारावीची परीक्षा राज्यातील नऊ विभागीय मंडळांच्या मार्फत घेण्यात आली होती. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांच्या वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेत राज्यभरातून 12 लाखांच्या आसपास विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने इयत्ता बारावीचा निकाल महत्त्वाचा मानला जात असल्याने सर्वांनाच निकालाच्या तारखेची उत्सुकता होती. राज्य मंडळाने गुरुवारी (25 मे) निकाल जाहीर होईल, अशी माहिती दिल्याने या सर्वांना दिलासा मिळाला आहे.
ऑनलाईन स्वरूपात जाहीर होणारा बारावीचा निकाल या संकेतस्थळांवर पाहता येईल
mahresult.nic.in
https://hsc.mahresults.org.in
https://hscresult.mkcl.org
https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023
http://mh12.abpmajha.com
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या संकेतस्थळांवर उपलब्ध होतील तसेच त्यांची प्रिंट घेता येईल, असे बोर्डाने कळवले आहे.