प्रतिभावान खेळाडू म्हणून इतर सर्व क्रिकेट संघातील खेळाडूंच्या तुलनेत शास्त्रींनी केली या खेळाडूची निवड

प्रतिभावान खेळाडू म्हणून इतर सर्व क्रिकेट संघातील खेळाडूंच्या तुलनेत शास्त्रींनी केली या खेळाडूची निवड
प्रतिभावान खेळाडू म्हणून इतर सर्व क्रिकेट संघातील खेळाडूंच्या तुलनेत शास्त्रींनी केली या खेळाडूची निवड

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री यांनी युवा खेळाडू शुबमन गिलचा जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये उल्लेख केला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या गेल्या काही हंगामांमध्ये सलामीवीर म्हणून कमी स्ट्राईक रेटमुळे गिलच्या टी-२० फलंदाजीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. या हंगामात पहिल्या सामन्यात देखील तो शून्य धावांवर बाद झाला होता. यानंतर गिलचे चाहते दु:खी झाले होते. परंतु, दुसऱ्या सामन्यातील त्याच्या शानदार खेळीनंतर रवी शास्त्री यांनी त्याचे कौतुक केले आहे.

पहिल्या सामन्यातील खेळीनंतर गिलच्या टीकाकारांनीही त्याच्यावर टीका करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, मात्र शनिवारी (२ एप्रिल) झालेल्या सामन्यात गिलने शानदार फलंदाजी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट ७६ धावा मागे टाकत ८४ धावांची धडाकेबाज खेळी खेळली आहे. त्याच्या या खेळीची प्रशंसा केली जात आहे. रवी शास्त्री यांनी देखील त्याचे कौतुक केले आहे.

Advertisement

रवी शास्त्री म्हणाले, ‘शुभमन गिलकडे हुशारी आहे. गिल देशातील आणि जगातील सर्वात प्रतिभाशाली खेळाडूंपैकी एक आहे. तो जेव्हा क्रिजवर जातो, तेव्हा तो धावा करतो.’ शनिवारच्या सामन्याबद्दल ते म्हणाले, ‘शाॅट सिलेक्शन, स्ट्राइक रोटेशन आणि कमी निर्धाव चेंडूनी त्याच्यावरील दबाव हटवला. तो शाॅर्ट चेंडू खूप चांगले खेळतो. त्याचा शाॅर्ट-आर्म जॅब आम्ही शनिवारच्या डावात पाहिला.’

या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरातने २० षटकात ६ विकेट्स गमावत १७१ धावा केल्या. शुबमन गीलने ४६ चेंडूत ८४ धावा केल्या, यामध्ये ६ चौकरांचा, तर ६ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर दिल्लीकडून रिषभ पंतने ४३, तर ललित यादवने २५ धावा केल्या. परंतु, दिल्ली हे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरली. दिल्ली २० षटकात ९ गडी गमावत १५७ धावांवरच सर्वबाद झाला.

Advertisement

गिल त्याच्या खेळीबद्दल बोलताना म्हणाला की, ‘मला संघासाठी एवढ्या धावा केल्यानंतर छान वाटले. मला असे वाटले नव्हते, परंतु कमीत कमी निर्धाव चेंडू खेळण्याची योजना होती. स्ट्राइक रोटेट करणे आणि जेव्हा शक्य असेल, तेव्हा एक धाव काढण्याचा प्रयत्न केला.’

Advertisement