प्रकाश आंबेडकर यांची सडेतोड भूमिका: कसबा-चिंचवड निवडणूकीत शिवसेनेला पाठिंबा, ‘मविआ’मागे फरफटत जाणार नाही


पुणे14 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

​​​​महाविकास आघाडीबाबत अद्याप शिवसेनाने आम्हाला काही कळवले नाही. मुंबई मनपात आघाडी करण्या दृष्टीने आमचे शिवसेनेशी बोलणे सुरू आहे. शिवसेनेने कसबा आणि चिंचवड निवडणूक लढणार असल्याचे घोषित केल्यानंतर आमचा त्यांच्या उमेदवारास पाठिंबा आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारामागे आम्ही फरफटत जाणार नाही. अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

Advertisement

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, दुर्देवाने काँग्रेस पक्षाने अर्थसंकल्पवार जे भाष्य केले. त्यातून त्यांनी मौन बाळगले असल्याचे दिसून येते. आपण श्रीलंकाच्या मार्गावर जात आहोत का? असे वातावरण निर्माण होत आहे. याबाबत अर्थतज्ञ यांनी खरी भूमिका नागरिकांना समजावून सांगितली पाहिजे. असे मत आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाकडे अर्थतज्ज्ञ यांची कमतरता नाही परंतु ते अर्थसंकल्पाबाबत तटस्थ भूमिका मांडताना दिसत नाही केवळ गोड भाष्य करतात. आगामी काळातील विविध राज्यातील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. भाजपकडून त्यांना जे राज्य प्रतिसाद देत नाही त्यांना बजेट मधील तरतुदी दिल्या जात नाही असे दिसून आले.

Advertisement

अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक

प्रकाश आंबेडकर म्हणाले, अर्थसंकल्पात सर्वात महत्वाचा मुद्दा हा केंद्र सरकारच्या तिजोरीत किती पैसे येणार आहे. हे पाहता येणारे उत्पन्न 27 लाख कोटी आहे.जो शासनाचा खर्च आहे तो 45 लाख तीन हजार 87 लाख कोटी आहे. त्यामुळे तफावत ही 18 लाख कोटींची आहे.त्यामुळे पैशाची कमतरता ही 50 टक्के असणे सक्षम अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक बाब आहे.

Advertisement

आर्थिक स्थिती बिघडलेली

प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्योजक अदानी यांचे शेअर्स संपूर्ण पडत असून त्याबाबत शासन काही बोलत नाही. बाजारातून 18 कोटी रुपये सरकारने उचलले तर उद्योग आणि विकासासाठी काय पैसा शिल्लक राहणार हे शासनाने स्पष्ट सांगावे. मध्यम वर्गाचे उत्पन्न वाढवू असे त्यांनी मागील वेळी सांगितले परंतु त्यात कोणते बदल त्यांनी यंदा केले नाही. कोविड काळात लोकांची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे.

Advertisement

भारत चीनकडून शिकला नाही

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मध्यम वर्गाच्या गरजा भागवल्याने ते खर्च अधिक करतील आणि शासनाचे उत्पन्न वाढेल असे सरकारला वाटते. परंतु भारत चीनकडून काही शिकला नाही असे दिसते. चीन मध्ये नोकरदार यांना वर्षातून एक ऐवजी चार वेळा बोनस दिला गेला परंतु लोकांनी केवळ 10 टक्के खर्च केले आणि उर्वरित पैसे हे बँकेत मुदत ठेव मध्ये ठेवले. केंद्र सरकारला असे वाटते की, लोक खर्च करतील आणि उत्पन्न वाढेल. परंतु यापुढे बँकेत मुदत ठेव वाढलेल्या दिसतील.

Advertisement

गुंतवणूकदार पैसे काढत आहे

प्रकाश आंबेडकर म्हणाले, जे लोक गरिबाच्या रेषेवर उभे आहे त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी काही करण्यात आले नाही. मनरेगा मधील गुंतवणूक सरकारने कमी केल्याने पूर्वी जे 100 दिवस काम मिळत होते ते 40 दिवसावर आल्याने लोकात असंतोष आहे. परदेशी गुंतवणूकदार आपले पैसे काढत आहे. त्यामुळे शासनाला अर्थसंकल्प चालविण्यासाठी आवश्यक निधी लागतो तो तरी उपलब्ध होईल का अशी शंका आहे. सरकार विरोधात लोकांची मानसिकता वाढत आहे. आमचे आणि शिवसेना यांचे युती दृष्टीने ठरलेले आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement