नागपूर2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाविरोधात नागपूरच्या स्थानिकांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. या वादात आदित्य ठाकरेंनी उडी घेतली असून आज ते नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत.
कोराडी परिसरातील नांदगाव, वराडा येथील गावांना ते भेटी देणार असून गावकरी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
पर्यावरणप्रेमींशी करणार चर्चा
नागपूरमधील हॉटेल रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे स्थानिक पर्यावरणप्रेमींशी कोराडी प्रकल्पावर चर्चा करणार आहेत.
पर्यावरणमंत्री असताना आदित्य ठाकरेंनी कोराडी आणि खापरखेडा वीज प्रकल्पाची दोनदा पाहणी केली होती. वीज प्रकल्पातून निघणाऱ्या धुरामुळे आणि राखेमुळे होत असणारी पर्यावरणाची हानी लक्षात घेऊन या प्रकल्पांचे राख बंधारे बंद करण्याचेही निर्देश देण्यात आले होते.
स्थानिकांचा विरोध
दरम्यान, कोराडी वीज प्रकल्पाची मागणी जोर धरू लागली.मात्र, स्थानिकांनी पुन्हा त्याला विरोध केला. शेतकरी, गावकऱ्यांसोबतच परिसरातील स्थानिक आणि स्वयंसेवी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या नव्या वीज प्रकल्पासाठी होणाऱ्या जनसुनावणीला देखील त्यांनी विरोध केला आहे.
काय आहे कोराडी प्रकल्प?
कोराडी वीज केंद्रात नव्याने ६६० मेगावॅटचे दोन नवे युनिट उभारण्याचे प्रस्तावित आहे. पर्यावरणप्रेमी, गावकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. एकूण १७०० मेगावॅट वीज निर्मीतीची क्षमता असणारा हा प्रकल्प असून नागपूरच्या उत्तरेकडील बाजूस प्रस्तावीत आहे.