अकोला37 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ करत सर्वसामान्यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. यामध्ये राष्ट्रीय बचत पत्र, मुदत ठेव, किसान विकास पत्र, मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ केली आहे, अशी माहिती पोस्ट विभागाचे प्रवर निरिक्षक यांनी दिली.
जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी सेव्हिंग स्कीमवरील व्याजदर ०.२० टक्के ते १.१० टक्के वाढवण्यात आले आहे. तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचे व्याजदर ७.१ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. किसान विकास पत्राच्या व्याजदरात ७ टक्कयावरून ७.२ टक्के वाढ करण्यात आले. शासनाच्या निर्णयानुसार, राष्ट्रीय बचत पत्रावर १ जानेवारीपासून ७ टक्के दराने व्याज मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ७.६ टक्क्यांऐवजी ८ टक्के व्याज मिळेल. एक ते पाच वर्षाच्या कालावधीसाठीच्या पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेवरील व्याजदर १.१ टक्क्यांनी वाढ केली आहे. अल्प बचत योजनांचे व्याजदर जानेवारी मे मार्च या तिमाहीसाठी जाहिर करण्यात आले असून या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे.
——–
अल्पबचत योजनांवरील व्याजदर असे
बचत ठेव ४ टक्के, एक वर्षाची ठेव ६.६० टक्के, दोन वर्षाची ठेव ६.८० टक्के, ३ वर्षाची ठेव ६.९० टक्के, पाच वर्षाची ठेव ७ टक्के, पाच वर्षाची आवर्ती ठेव ५.८ टक्के, ज्येष्ठांची बचत योजना ८ टक्के, मासिक उत्पन्न योजना ७.१० टक्के, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ७ टक्के, पी.पी.एफ. ७.१० टक्के, किसान विकास पत्र ७.२ टक्के तर सुकन्या समृद्धी योजनेकरीता ७.६ टक्के व्याजदर जाहिर करण्यात आला आहे, अशी माहिती पोस्ट विभागाचे प्रवर निरिक्षक यांनी दिली आहे.
.