पोस्टातील सर्व्हर अर्धा दिवस डाऊन: पोस्टालीत काम थकल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त


जळगाव21 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पोस्टातील सर्व्हर बुधवारी अर्धा दिवस डाऊन तर दुपारनंतर धिम्यागतीने चालल्याने मुख्य पोस्ट कार्यालयासह पोस्टाच्या सब कार्यालयांमध्ये पोस्टात विविध कामानिमित्ताने आलेल्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागले. दर एक-दोन दिवसांत पोस्टाच्या सर्व्हर डाऊन होणे धिम्या गतीने चालणे अशी समस्या येत असल्याने उपस्थित नागरिकांनी रोष व्यक्त केला.

Advertisement

याबाबत मुख्य पोस्ट कार्यालयाशी संपर्क केला असता मुंबई, चेन्नई येथील कार्यालयांत सर्व्हर डाऊन असल्याने सर्व ठिकाणच्या पोस्ट कार्यलयांत ही समस्या असल्याचे सांगण्यात आले.

बुधवारी विविध पोस्ट कार्यालयांत सर्व्हर डाऊन व धिम्या गतीने चालल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यात मुख्य पोस्ट कार्यालयांसह सब पोस्ट कार्यालयात नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागले. बँकांमध्येही गर्दी होते. त्यामुळे अनेक नागरिकांनी पोस्टात खाते उघडून पेन्शन वर्ग केली आहे. त्यामुळे पोस्टातही सकाळपासून गर्दी होते. मात्र, येथेही सर्व्हरमुळे महिला, ज्येष्ठ नागरिकांचे हाल होतात. गेल्या काही दिवसांपासून अनेकदा हे सर्व्हर डाऊन होत असल्याने ही समस्या नित्याचीच असल्याचे नागरिकांनी सांगितले. या बाबतही बुधवारी पोस्ट कार्यालयात तसा बोर्डच लावण्यात आल्याने अनेकांनी पोस्ट कार्यालयातून काढता पाय घेतला.

Advertisement

महिला – ज्येष्ठांना शिक्षा

सर्व्हर डाऊन वा धिम्यागतीने चालत असल्याने महिलांसह ज्येष्ठांना तासंतास रांगेत उभे राहण्याची शिक्षा आहे. अनेकांना सुकन्या योजनेसह विविध योजनांतील पैसे भरणा करण्याची गरज पडते. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे ज्येष्ठांसह महिलांच्या वेळेचा अपव्यव होतो. अनेकांना रांगेते उभे राहण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. ज्येष्ठांसह महिलांना घरून परत येता येत नसल्याने नागरिक नंबर येण्याची वाट पाहत थांबून राहतात.

Advertisement

अनेकदा फेऱ्यांची शिक्षा

सुरक्षित ठेवीसाठी आजही नागरिकांचा पोस्टावर भरवसा आहे. इंटरनेट, कुरिअरच्या जमान्यातही पोस्टाचा ग्राहक कमी झालेला नाही. गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन वा धिम्या गतीने चालणे ही समस्या भेडसावत आहे. बुधवारी सर्व्हर डाऊनमुळे सकाळी १० वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत सर्व्हर बंद होते. त्यानंतर सुरू झाले मात्र तेही अतिषय धिम्यागतीने सुरू होते.

Advertisement

– देवेंद्र वंजारी, पोस्ट ग्राहक

मुंबई, चेन्नईवरूनच समस्या

Advertisement

मुंबई, चेन्नई येथील कार्यालयांतूनच सर्व्हर डाऊन सुरू होण्याची समस्या असल्याने सर्वच ठिकाणच्या पोस्ट कार्यलयांत ही समस्या आहे. सकाळी काही वेळ पोस्टाचे काम बंद होते. मात्र, नंतर धिम्या गतीने सर्व्हर सुरू होते. वरिष्ठ कार्यालयाकडे मेलद्वारे माहिती दिली आहे. समस्येबाबत आमचे कर्मचारी सर्वांना सौजन्याने सांगतात.

– भोजराज चव्हाण, डाक अधीक्षक

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement