अकोटएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
फेड उपकाराची करण्या
साजरा करू पोळा!
पुरण पोळीचा खाऊ बैलांना
हा तर कुटुंब सोहळा!!
भारत सारख्या कृषीप्रधान देशात आणि महाराष्ट्रा सारख्या पारंपारिक प्रथा जोपासणाचा राज्या मध्ये पोळा ह्या सणाचे महत्त्व वेगळे सांगावे लागत नाही.पोळ्याच्या दिवशी ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात सुद्धा बैला प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावोगावी पोळा भरविला जातो.
बैलां सारखाच उपयुक्त असणारा गाढव या पशु बद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याची पूजा करण्याची परंपरा अकोट मध्ये पाडली जाते.कुंभार आणि भोई समाज द्वारे श्रम सन्मान करण्यासाठी पोळ्याच्या दिवशी गाढवांची पूजा केली जाते बैल पोळ्यासारखा गाढवांचा पोळा भरत नसला तरी पूजा करून त्यांचा मानसन्मान मात्र ठेवला जातो. सकाळीच गाढवांना आंघोळ घालून स्वच्छ केले जाते.त्यांचे अंगावर रंगसंगती साधन विविध रंगाचे पट्टे मारले जातात.या रंगां द्वारे त्यांना सुशोभित केले जाते.
गळ्यामध्ये फुलांचे हार घातले जातात.
एखादा हौशी गाढव मालक एखादे नवीन कापड झूल म्हणून त्यांच्या पाठीवर पांघरतो.त्या नंतर घरातील गृहिणी किंवा मुलींच्या हातून गाढवाची पूजा केली जाते.त्याला गोड अन्नाचा पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो.व पोळ्याच्या दिवशी गाढव आणि त्याचा मालक काम न करता आराम करतात.
खते नेण्यासाठी गाढवाचाच वापर
उपयोगी पडणारा पशु-कुंभार आणि भोई समाज बांधवां साठी गाढव हा उपयोगी पशु आहे.त्याच्या पाठीवर विविध प्रकारचे ओझे वाहून नेऊन कुंभार व भोई समाज आपली उपजिविका करतात.पावसाळ्याच्या दिवसात शेतरस्ते चिखलाचे झाल्यावर शेतात खते नेण्यासाठी गाढवाचाच वापर केला जातो.
अकोटचे गाढव मालक श्रीराम कंडाले म्हणाले की, आमचा अन्नदाता-गाढव हा आमचा अन्नदाता आहे.आमची उपजिविका चालविण्या मध्ये त्याचा फार मोठा वाटा आहे.
अकोटचे गाढव मालक प्रल्हाद चवरे म्हणाले की, गाढव हा आज्ञाधारक- एकदा ओझे पाठीवर लादून दिल्यावर गाढवाला इशारा केला तो चालायला लागतो हा आज्ञाधारक पशु आहे.आमचा जिवाभावाचा साथी आहे.