पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा धावताना मृत्यू: अकोल्याच्या वसंत देसाई स्टेडियमवरील घटना; स्वप्न भंगले

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा धावताना मृत्यू: अकोल्याच्या वसंत देसाई स्टेडियमवरील घटना; स्वप्न भंगले


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Incident At Akola’s Vasant Desai Stadium: Girl Preparing For Police Recruitment Dies While Running; Missed The Opportunity By 2 Points Last Year, Dream Unfulfilled

अकोला34 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पोलिस भरतीसाठी अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियमवर धावण्याचा सराव करताना 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. रोशनी अनिल वानखडे (रा. धोतर्डी) असे या तरुणीचे नाव असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जीएमसीमध्ये नेण्यात आला आहे. गुरुवारी तपासणीनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

Advertisement

स्वप्न अधुरे

अकोला तालुक्यातील धोतर्डी येथील गरीब कुटुंबातील रोशनी हिच्या वडिलांचे निधन झाले असून कुटुंबात आई, दोन भाऊ आणि बहीण आहे. पोलिस बनण्याचे तिचे स्वप्न होते. त्यासाठी ती अहोरात्र तयारी करीत होती. गेल्या काही दिवसांपासून रोशनी ही रणपिसे नगर येथील तिच्या बहिणीकडे राहत होती.

Advertisement

धावताना कोसळली

काही महिन्यांपासून रोशनी पोलिस भरतीसाठी वसंत देसाई स्टेडियमच्या मैदानावर सकाळ-सायंकाळ शारीरिक कसरत आणि धावण्याचा सराव करीत होती. मात्र बुधवारी सायंकाळी धावताना ती अचानक कोसळली. यावेळी तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींनी तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिची हालचाली झाली नाही. त्यानंतर तिला तत्काळ रिक्षातून रुग्णालयात भरती केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Advertisement

धावण्याचा सराव करणाऱ्यांना धक्का

रोशनीच्या मृत्यूमुळे मैदानावर धावण्याचा सराव करणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे. आधीच वडिलांचे छत्र हरवलेले असताना पोलीस होऊन कुटुंबाला हातभार होईल, असे तिचे स्वप्न होते. मात्र रोशनीच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, तिच्या नातेवाइकांचे सांत्वन आणि मदत रुग्ण कल्याण समितीचे सदस्य पराग गवई यांनी केले. सध्या तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर तिचा मृत्यू ह्दयविकाराने झाला की, आणखी कोणत्या कारणाने याचा उलगडा होणार आहे.

Advertisement

गतवर्षी 2 गुणांनी हुकली संधी

मागील वर्षी रायगडला पोलीस भरतीमध्ये रोशनीने प्रयत्न केला होता. मात्र, तिला दोन गुण कमी पडले होते. त्यानंतर पुन्हा जिद्दीने तिने सराव सुरू केला. पोलिस बनण्याचे तिच्या नातेवाइकांचे स्वप्न अधुरेच राहिले. रोशनीला कोणताही आजार नव्हता, अशी माहिती समोर येत आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement