पोलिस दलात खळबळ: भाेसरी एमआयडीसी ठाण्यातील पाेलिस अंमलदाराची गळफास लावून आत्महत्या! कारण अस्पष्ट


पुणे13 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड आयुक्तलयाच्या अंर्तगत भाेसरी एमआयडीसी पाेलिस स्टेशनमध्ये काम करत असलेल्या पाेलिस अंमलदार विशाल माने यांनी यशवंतनगर येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज उघडकीस आली.

Advertisement

विशाल माने यांची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेली हाेती. माने यांचे पश्चात आई, वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. विशाल माने हे भाेसरी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात काम करत असून गुरुवारी यांची साप्ताहित सुट्टी हाेती. त्यामुळे काही मित्रांसाेबत ते बाहेर फिरण्यासाठी गेले हाेते. रात्री घरी परतल्यानंतर त्यांनी आईवडीलांशी बाेलणे केले व झाेपण्यासाठी ते बेडरुम मध्ये गेले. परंतु बेडरुम मध्ये गेल्यावर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

शुक्रवारी सकाळी घरातील लाेक बेडरुमचा दरवाजा वाजवून ही दरवाजा उघडला जात नसल्याने कुटुंबियांनी शेजाऱ्यांना बाेलवून दरवाजा ताेडला. त्यावेळी विशाल माने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यांचे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पिंपरी पाेलीस ठाण्यात अक्समात मयताचा गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.

Advertisement

फुकट कपडे न दिल्याने दुकानदारास मारहाण

देहूराेड परिसरातील किवळे मधील विकासनगर येथील वाडी मेन्स वेअर या दुकानाचे मालकास रफिक शेख नावाचे आराेपीने फाेन करुन फुकट कपडे मागितले. मात्र, त्यास दुकानदार राेहन राजेश देशमुख (वय-२२) याने फुकट कपडे देण्यास नकार दिला असता, खे हा त्याचा साथीदार राकेश तेलगु याच्यासह दुकानात येऊन त्याने देशमुख यांचा पार्टनर एडविन यास शिवीगाळ करुन काेयत्याचा धाक दाखवून मारहाण करत दुकानातून दाेन जिन्स पँट व एक शर्ट जबरदस्तीने चाेरुन नेला. तसेच एडविन याचेकडून गुगल पे द्वारे एक हजार रुपये हफ्ता घेवून गेला आहे. याप्रकरणी देहुराेड पाेलीस ठाण्यात दाेन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

AdvertisementSource link

Advertisement