छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
- क्रांती चौक ते औरंगपुरा मार्गावर 350 कर्मचाऱ्यांचा राहणार कडेकोट बंदोबस्त
छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजातर्फे रविवारी आयोजित केलेला माेर्चा व सभेला शहर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता परवानगी नाकारली असल्याचे शनिवारी रात्री आयोजकांना पत्राद्वारे कळवले. मात्र, मोर्चा निघण्याची दाट शक्यता पाहता पोलिसांनी रविवारी कडेकोट बंदोबस्त तैनात असेल. पोलिस उपायुक्तांसह ३३ अधिकारी व सुमारे ३५० पोलिस कर्मचारी हजर राहतील.
मोर्चात जवळपास १ लाखापर्यंत समर्थक सहभागी होतील, असा दावा समितीचे सदस्य विनोद पाटील यांनी केला. कोणालाही आमंत्रण दिले नाही : वादग्रस्त वक्तव्य करणारे तेलंगणाचे आ. टी. राजा हेदेखील या मोर्चात सहभागी होणार असल्याचे त्यांनी व्हिडिओद्वारे जाहीर केले आहे. त्यांना आम्ही आमंत्रण दिले नाही, असे आयोजकांनी स्पष्ट केले.
…तर क्रांती चौक वाहतुकीसाठी बंद केला जाईल सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होऊन औरंगपुऱ्यातील महात्मा फुले पुतळ्याजवळ मोर्चा विसर्जित केला जाणार आहे. मोर्चासाठी क्रांती चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दी वाढल्यास क्रांती चौकातील वाहतूक पूर्णपणे बंद करून गाेपाल टी ते सिल्लेखाना मार्गावरील वाहतूक इतरत्र वळवण्याचा निर्णय पोलिस घेतील.