पुणे7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
राज्य स्पर्धामुळे आपल्या खेळडूंना राष्ट्रीय स्तरावर कामगिरी करण्यासाठी पाठबळ मिळते. राज्य आणि पोलीस दलाचे नाव मोठे करण्याचे काम खेळाडू करतात त्यामुळे आपण अशाप्रकारे स्पर्धा आयोजित करतो. अनेक रेकॉर्ड या स्पर्धेत आपण निर्माण केले आहे. चांगले क्रीडा संकुल तयार करण्याचा प्रस्ताव पोलीस दलाने दिला असून पुण्यात पोलिसांसाठी उत्तम क्रीडा संकुल आणि निवास व्यवस्था असलेले सुसज्ज हॉस्टेल निर्माण करण्यात येईल असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
पोलिस क्रीडा स्पर्धेचा समारोप
33 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2023 या स्पर्धेचा समारोप समारंभ एसआरपीएफ,ग्रुप, रामटेकडी,वानवडी,पुणे येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, चिरंजीव प्रसाद, विनय चौबे ,पोलीस सहआयुक्त,संदीप कर्णिक उपस्थित होते.
म्हणून राज्य प्रगती करतंय
देवेंद्र फडणवीस म्हणाले, चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पडली आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्ष ही स्पर्धा घेता आली नाही. यंदा खेळाडू यांचा उत्स्फूर्त सहभाग होता आणि 13 संघांनी यात सहभाग घेतला. महाराष्ट्र मधील पोलीस दल देशात सर्वात चांगले पोलिस दल आहे. लोकशाही मूल्यं जपण्यासाठी पोलिस दल कार्यरत असून विपरीत परिस्थितीमध्ये ते काम करतात. कोरोनाकाळात अथक काम पोलिसांनी करून उल्लेखनीय काम त्यांनी केले. राज्यात आज उत्तम प्रकारे कायदा आणि सुव्यस्था राखत असल्याने राज्य प्रगती करत आहे.
खचू नका, खेळाडू वृत्ती जपा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलिस दल यादृष्टीने चांगल्या प्रकारे काम करत असल्याने देश पातळीवर आपल्या पोलिसांचे काम सदैव उल्लेख केला जातो. खेळात जिंकणे आणि हरणे सुरू असते पण जिद्दीने आपण खेळाडू वृत्ती जपली पाहिजे तर आयुष्यात आपण कधी खचून जाणार नाही. पोलिस दल ज्याप्रकारे काम करते त्यातून त्याना उभारी देण्यासाठी खेळ महत्वपूर्ण साधन आहे.