28 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
महाराष्ट्रात महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यातल्या त्यात मुंबईत तर महिला अजिबात सुरक्षित नाहीत, असेही म्हटले गेले होते. मात्र, आता या आरोपाबाबत अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. मुंबईतील महिलांच्या विरोधात होणाऱ्या गुन्ह्यांसंबंधी मुंबई पोलिसांनी एक अहवाल सादर केला आहे. यामध्ये महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
देशाची आर्थिक राजधानी बरोबरच मायानगरी असलेल्या मुंबईत महिला त्यांच्या घरातही सुरक्षित नसल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचा खुलासा या अहवालात झाला आहे.
अत्याच्याराच्या घटनांचा मोठा आकडा समोर
सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबईत महिलांच्या हत्येच्या तसेच अत्याचाराच्या असंख्य घटना रोज समोर येत आहेत. मुंबई पोलिसांच्या वतीने जाहिर करण्यात आलेल्या अहवालानुसार, गेल्या 4 महिन्यात खून, अपहरण, खुनाचा प्रयत्न, हुंडाबळी, लैंगिक शोषण, विनयभंग आणि महिलांवरील गैरवर्तन अशा घटनांचा मोठा आकडा समोर आला आहे. महिला अत्याचाराचे 93 पोलिस ठाण्यांमध्ये 1977 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये 1470 प्रकरणे सोडवली असल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी ते एप्रिल या कालावधीत हा आकडा 65 टक्के होता.
दररोज 16 गुन्ह्यांची होते नोंद
या अहवालानुसार मुंबई पोलिसांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या दररोज 16 गुन्ह्यांची नोंद होत आहे. म्हणजेच दर महिन्याला सुमारे 480 महिला अत्याचाराचे गुन्हे नोंदवण्यात येत आहे. ही आकडेवारी खुप मोठी असल्याने या बाबत चिंता व्यक्त केली जात आहे. असे असले तरी गेल्या वर्षीच्या जानेवारी ते एप्रिल या काळात महिलांवरील अत्याचाराच्या 2078 गुन्ह्यांपैकी फक्त 1341 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
हुंड्यासाठी छळाची सर्वात कमी कर अपहरणाचे सर्वाधिक प्रकरणे
मुंबई पोलिसांच्या वतीने जाहिर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार बलात्कार, बेपत्ता, अपहरण आणि हुंड्यासाठी छळ यावर सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद होते. अहवालानुसार, जानेवारी ते एप्रिलपर्यंत मुंबई पोलिसांनी बलात्काराचे 325, अपहरणाचे 407 आणि हुंडाबळीचे 228 गुन्हे नोंदवले आहेत. यापैकी 286 गुन्हे बलात्काराचे आणि 332 अपहरणाचे होते, तर हुंड्यासाठी छळाचे फक्त 95 प्रकरणे सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे.
60 दिवसांत आरोपपत्र दाखल
माजी डीजीपी संजय पांडे यांनी महिला गुन्ह्यांची सुनावणी लवकर होऊन गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासाठी 60 दिवसांत गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. हा दर गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत 65% होता, जो या वर्षी 9% ने वाढून 74% झाला आहे अशी माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते डीसीपी विशाल ठाकूर यांनी दिली आहे.