पोपट काही खात नाही, पोपटाला काही ऐकायला येत नाही: किरीट सोमय्या यांचा मुंबई महापालिकेवर आणखी एका घोटाळ्याचा आरोपमुंबई2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पोपट काही खात नाही, पोपटाला काही ऐकायला येत नाही, पोपट पाणी पित नाही. पोपट पेरू खात नाही, असे काही अहवालात म्हटलेले नाही. तसेच पोपट मेलाय असे देखील म्हटलेले नाही. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी नेमलेल्या समितीवर आरोप करताना किरीट सोमय्या यांनी पोपटाचे उदाहरण दिले. मुंबई महापालिकेवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

Advertisement

कोरोना काळात मुंबई महापालिकेत 100 कोटींच्या घोटाळ्याचा चौकशी अहवाल आला आहे. महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे यांनी हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात फोर्जरी झाली आहे, असे म्हटलेय. पण अहवालाच्या शेवटी कारवाई करायची गरज नाही, असा शेरा धामणे यांनी मारला आहे. त्यामुळे या प्रकरणी सुनील धामणे यांचीच चौकशी करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

एकाच स्टॅम्प पेपरवर 2 करार

Advertisement

किरीट सोमय्या यांनी महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत पत्रकार परिषद घेतली आहे. महापालिकेच्या कोरोना काळातील घोटाळ्याबाबत मी आझाद मैदान कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने चौकशी करायला सांगितली होती. सुजित पाटकर यांनी खोटी कागदपत्रे सादर केली. एकाच स्टॅम्प पेपरवर दोन करार केले. एक मुंबई आणि दुसरा पुणे महापालिकेसोबत करार केला.

कंपनीची नोटरी फोर्जरी

Advertisement

किरीट सोमय्या म्हणाले, पालिकेने दोन सदस्यांची समिती नेमली. सहआयुक्त सुनील धामणे यांच्या अध्यक्षतेखाली 6 एप्रिल 2022 ला समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. समितीच्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस ही कंपनी अस्तित्वात केव्हा आली यावर महापालिकेने लिगल ओपिनियन मागितले. त्यावर विधी विभाग म्हणाले, या कंपनीची नोटरी फोर्जरी आहे. महाराष्ट्रात पार्टनरशीप डीड करणे कायद्याने बंधनकारक आहे.

धामणेची चौकशी का केली नाही?

Advertisement

किरीट सोमय्या म्हणाले, महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणेची चौकशी का केली नाही? पालिकेने सुजीत पाटकर आणि लाइफलाइन हॉस्पिटल विरोधात तक्रार का केली नाही? असे सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement