पोटलीबाबा : ही दोस्ती तुटायची नाय!|| श्रीनिवास बाळकृष्ण

Advertisement

गोष्टी ऐकल्या जातात, ऐकवल्या जातात, बोलल्या जातात, वाचल्या जातात; पण काही गोष्टी चित्रांतून पाहिल्याही जातात. चित्रांशिवाय पूर्ण होऊच न शकणाऱ्या गोष्टी/ कथा आपण ‘पोटलीबाबा’ या सदरात पाहणार आहोत. सोबत चित्रकाराने त्यात कुठल्या चित्रपद्धतीचा, माध्यमाचा वापर केला आहे, का केला आहे हेही जाणून घेणार आहोत. त्या पद्धतीचा वापर करून स्वत:च्या चित्रकथा फुलवणार आहोत. मग येताय ना गोष्ट ऐकायला… सॉरी पाहायला?

तुम्हाला म्हणून सांगतो की, माझ्या सोसायटीत, बाजूच्या चाळीत, कोळीवाड्यात, बाजारात, माझ्या वर्गात, इतर तुकड्यांत, वरच्या वर्गात, शेजारच्या शाळेत, शाळेबाहेर, मैदानात, बागेत, गॅरेजमध्ये आपले चिक्कार मित्र, दोस्त, यार, फ्रेंड्स आहेत. त्यात वयाने छोटे व मोठेही आहेत. माझ्या या मित्रपरिवाराबद्दल आईला अजिबात कल्पना नाहीये.

Advertisement

तिच्या मते, मी फक्त पहिल्या बाकावर बसणाऱ्या अभ्यासू मुलांशीच बोलावं. तिला वाटतं की, मोठी मुलं मला फसवतील. मारतील. काहीतरी मला बिघडवणारं शिकवतील. अशी उगाचची चिंता तुमच्या मागे असते का? या काळजीपायी दोस्ती तुटलीये का?

‘इकतारा प्रकाशन’चं ‘एक बडा अच्छा दोस्त’ या हिंदी पुस्तकातला पिलू कावळा त्याच्या कावळीण आईला काय सांगून दोस्ती टिकवतो? दोस्ती पण कुणाशी? तर एका मोठ्या हत्तीशी! एकदा हे आनंदाने आपल्या आईला सांगतो आणि तिथंच फसतो. त्याला आईची भीतीर, चिंता, शंका यांचा सामना करावा लागतो. कावळ्यांची पोरं नेहमीच हुशार आणि मधुर वाणीची असल्याने त्याने शेवटी कावळीण आईची काळजीयुक्त भीती घालवून गोष्ट संपवली.

Advertisement

हाडांचा डॉक्टर असलेला लेखक बाबक साबरी आणि लहानपणापासून तीन देश बदलावे लागलेला चित्रकार मेहरदाद जायरी हे दोघेही मूळचे इराणचे. त्यांची ही कल्पना. कारण त्यांनाही अशाच अनुभवाला तोंड द्यावं लागलं होतं.

यात मला आवडलं ते चित्रकाराने खराखुरा हत्ती आणि आईच्या कल्पनेतला भीतीदायक दिसणारा हत्ती वेगळ्या पद्धतीने काढले आहेत. त्यांचे नुसते आकारच बदलले नाहीत, तर पेन्सिल आणि कदाचित पेन असे दोन प्रकार वापरलेत. ६बी, ८बी अशा गडद पेन्सिल तिरपी घासून पाहा.

Advertisement

हिरवा किंवा लाल असे पेनाने काही आकार काढून पाहू यात. पुन्हा बॅकग्राऊंडला कोलाजसारखं पेपर कट करून झाडांचा फील दिलाय. हे तर फारच सोप्पंय.

इतका मोठा हत्ती आणि सोबतचा इवलासा कावळा यांना एकाच पानावर आणायचं हे कठीण काम चित्रकाराने मस्त दाखवलं आहे. ही पुस्तकातील काही चित्रं पाहा. तुम्ही मोठा आकार आणि छोटा आकार असा एकाच चित्रात काढून पाहिलाय का?

Advertisement

हत्ती तर सर्वांनीच पाहिलाय. पण तुम्ही त्याच्या जागी भूत, डायनासोर, एलियन, मोठा मासा असं काहीही घेऊन नवी कथा तयार करू शकता. आणि ही गोष्ट चितारून मला पाठवायला विसरू नका!

[email protected]

Advertisement

The post पोटलीबाबा : ही दोस्ती तुटायची नाय! appeared first on Loksatta.Source link

Advertisement