पोटच्या मुलीकडे शरीर सुखाची मागणी: 47 वर्षीय बापाला 18 महिने सक्तमजुरीची शिक्षा; अश्लिल व्हिडिओ दाखवत केली होती मागणी


औरंगाबाद33 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

औरंगाबाद पोटच्‍या मुलीला मोबाइल मध्‍ये अश्लिल व्हिडीओ दाखवून बळजबरी तिच्‍या गुप्‍तांगांना स्‍पर्श करुन शरिरसुखाची मागणी करणार्या 47 वर्षीय नराधम बापाला 18 महिने सक्तमजुरी आणि 500 रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधिश के.आर. चौधरी यांनी ठोठावली.

Advertisement

प्रकरणात 20 वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, पीडिता ही उच्च शिक्षीत असून तीने 2021 साली पॉलिटे‍क्नीकचा डिप्‍लोमा पूर्ण केला आहे. घटनेच्‍या सुमारे पाच वर्षांपूर्वी पीडिता ही 16 वर्षांची असतांना नराधम बाप पीडितेला मोबाइलमध्ये अश्लिल व्हिडिओ दाखवून बळजबरी तिच्‍या गुप्‍तांगांना स्‍पर्श करित होता. ही बाब पीडितेने आईला वेळो वेळो सांगितली, मात्र आई विश्‍वास ठेवत नव्‍हती. पीडिता 10 वीत असतांना नराधमाने तिच्‍याकडे शारिरसुखाची मागणी केली होती. त्यावेळी पीडितेच्‍या आईने व पीडितेने नराधमाला समाजावून सांगितले. काही दिवस शांत राहुन नराधमाने पुन्‍हा अश्लिल चाळे सुरु केले. पीडितेच्‍या आईने नराधमाला पुन्‍हा समजावून सांगितले, मात्र तो पीडितेला शारिरीक संबंध करायला सांग असे म्हणत होता. त्‍यानंतर 3 मे 2021 रोजी पीडितेने नराधम बापाविरोधात महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार केली.

6 मे 2021 रोजी दुपारी साडेचार वाजेच्‍या सुमारास पी‍डिता ही स्‍वयंपाक करित होती तर पीडितेची आई व लहान भाऊ दुसर्या खोलीत बसलेले होते. स्‍वयंपाक घरात अचानक आरोपी आला व त्‍याने पीडितेला पाठीमागुन मिठी मारित अश्लिल चाळे सुरु केले. घाबरलेल्या पीडितेने मोठ्याने आरडा-ओरडा केल्याने पीडितेची आई ते‍थे आली. आईने नराधमाला समजावून सांगितले, मात्र नराधमाने पुन्‍हा पीडितेकडे शारिरसुखाची मागणी केली. प्रकरणात एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

Advertisement

प्रकरणात तत्‍कालीन उपनिरीक्षक निरीक्षक प्रिती फड यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भादंवी कलम 354 (अ) अन्‍वये 18 महिने सक्तमजरी आणि 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून जमादार शेख रज्जाक यांनी काम पाहिले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement