पैठण मराठा क्रांती मार्चाच्या वतीने लाँग मार्च: उद्या सकाळी 11 वाजता शहरात पोहोचणार; विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार

पैठण मराठा क्रांती मार्चाच्या वतीने लाँग मार्च: उद्या सकाळी 11 वाजता शहरात पोहोचणार; विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Long March On Behalf Of Paithan Maratha Kranti March, Will Reach The City At 11 Am Tomorrow; A Statement Will Be Made To The Chief Minister For The Various Demands Of The Maratha Community

छत्रपती संभाजीनगर9 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकडे मंत्रीमंडळाचे लक्ष वेधण्यासाठी पैठण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लाँंग मार्च काढण्यात आला आहे. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत शहरात पोहोचेल. निदर्शने व ठिय्या, आक्रोश आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलनाचा समारोप होईल. अशी माहिती समन्वयकांनी दिली.

Advertisement

आंतरवाली सराटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला एका महिन्यात आरक्षण देण्याची ग्वाही दिली. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांनाच ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेल. ते तसेही मिळते. त्यामुळे याचा काहीच फायदा होणार नाही. ज्यांच्याकडे कुणबीची नोंदच सापडत नाहीत, असा गोरगरीब मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. त्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे. हि बाब सरकारने आवर्जुन समजून घेणे नितांत गरजेचे आहे. याच बरोबर मराठा समाजासाठीच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.

जनजागृती केली जात नाही. त्यामुळे योजना कागदावरच आहेत. अण्णासाहेब आर्थिक मागास आर्थिक विकास महामंडळ वैयक्तिक कर्ज योजनेतून बँका कर्जच देत नाहीत. जागोजागी त्रूटी कढून प्रस्ताव ना मंजुर केला जातो. अडवणूक करून लांबणीवर टाकले जातात. त्यामुळे बेरोजागारांची कुचंबणा होत आहे. हि समस्या सरकारने त्वरीत सोडवावी. महामंडळाने 5 लाख रूपयापर्यंतचे कर्ज स्वत द्यावे, यासाठी सरकारने महामंडळाला निधी उपलब्ध करून द्यावा. या प्रमुख मागण्यासांठी पैठण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11.10 वाजता पैठण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ पुतळ्यास अभिवादन करून लाँग मार्चाला सुरुवात करण्यात आली.

Advertisement

बिडकीनला रात्री मुक्काम

मराठा क्रांती मोर्चातील तरूण 30 किलोमीटर अंतर पायी चालून बिडकीनला आल्यावर रात्री येथेच मुक्काम करणार आहे. सकाळी 6 वाजता पुन्हा छत्रपती संभाजीनगर शहराच्या दिशेने लाँग मार्चला सुरुवात होईल. सकाळी 11वाजेपर्यंत पाच हजारहून अधिक जणांचा समावेश असलेल्या विराट लाँग मार्च शहरात दाखल होणार आहे.

Advertisement

लक्षवेधी

लाँग मार्च, सर्वांच्या डोक्यावर भगवी टोपी, त्यावर एक मराठा लाख मराठा लिहिलेले आहे. महिलांचाही उत्स्फूर्तपणे सहभाग आहे. शिवध्वज आणि एक मराठा लाख मराठा, देत कसे नाही घेतल्या शिवाय राहात नाही, अशा घोषणांनी संपूर्ण पैठण मार्ग दणाणून गेला असून हे सर्व लक्षवेधी ठरत आहे.

AdvertisementSource link

Advertisement