पेन, पेन्सिल, बॉलपॉइंट पेन वापरल्यास मतदान ठरणार बाद: विधान परिषद पदवीधर मतदानासाठी वापरावा लागणार जांभळ्या रंगाचाच स्केचपेन


नाशिक9 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नाशिक विभागातील सत्यजीत तांबे आणि शुंभागी पाटील यांना मिळणाऱ्या विविध पक्षांचा पाठिंब्याचा घोळ अद्याप मिटलेला नाही. मात्र, मतदारांना मतदान करताना मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या स्केचपेनचाच वापर करावा लागणार आहे. इतर कोणत्याही रंगाचा किंवा अन्य पेन, पेन्सिल, बॉलपॉइंट पेन वापरल्यास ते मतदान बाद ठरणार असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

Advertisement

हे महत्वाचे

  • पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे ‘पसंतीक्रम नोंदवा’ या रकान्यात 1 हा अंक लिहावा लागणार आहे.
  • एकापेक्षा अधिक उमेदवार निवडून द्यायचे असले तरी 1 हा क्रमांक एकाच उमेदवाराच्या नावापुढे नोंदवावा लागणार आहे.
  • निवडून देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या संख्येइतके पसंतीक्रमांक उपलब्ध ठेवण्यात आले आहेत.
  • उरलेल्या उमेदवारांसाठी आपल्या पसंतीक्रमानुसार पसंतीक्रमांक अनुक्रमे 2, 3, 4 असे नोंदवावे लागणार आहे.
  • कोणत्याही उमेदवाराच्या नावापुढे केवळ एकच अंक नोंदवावा लागणार आहे.
  • एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावापुढे तो नोंदविता येणार नाही.
  • पसंतीक्रम हे फक्त अंकांमध्येच नोंदवावे लागतील.
  • अंकांच्या आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये म्हणजे 1, 2, 3 किंवा रोमन लिपीमध्ये म्हणजे I, II, III किंवा भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये मान्यता दिलेल्या कोणत्याही भारतीय भाषेच्या लिपीमध्ये पसंतीक्रमांक नोंदविता येतील.
  • मतपत्रिकेवर स्वाक्षरी,आद्याक्षरे, नाव किंवा कोणताही शब्द लिहिता येणार नाही.
  • मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटविता येणार नाही.

पसंतीक्रम नोंदवणे ऐच्छिक

Advertisement

पसंतीक्रम दर्शविण्यासाठी चौकोनी खुणा केल्या तर मतपत्रिका अवैध ठरणार आहे. तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी तुमचा पहिला पसंतीक्रम कोणत्याही एका उमेदवाराच्या नावापुढे 1’ हा अंक नमूद करून नोंदविणे आवश्यक असुन इतर पसंतीक्रम नोंदवणे हे ऐच्छिक असुन बंधनकारक नसल्याचेही गमे यांनी सांगितले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement