पून्हा एकदा विजय: अजय देशमुख पाचव्यांदा विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी; 13 पैकी 12 जागांवर दणदणीत विजय


अमरावतीएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी सलग पाचव्यांदा निवडून येण्याचा विक्रम अजय देशमुख यांनी नोंदवला आहे. आज, रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत ते पाचव्यांदा या पदावर विजयी झाले. त्यांच्यासह समता पॅनलचे डझनभर पदाधिकारी निवडून आले. तर प्रतिस्पर्धी गाडगेबाबा पॅनलने सहसचिवाची एक जागा जिंकत यावर्षी खाते उघडले.

Advertisement

प्रत्येकी एक अध्यक्ष, महासचिव व कोषाध्यक्ष, प्रत्येकी दोन उपाध्यक्ष आणि सहसचिव तसेच कार्यकारिणीचे सहा सदस्य अशा 13 जागांपैकी सहसचिवाची एक जागा वगळता उर्वरित सर्वच्या सर्व जागा अजय देशमुख यांच्या नेतृत्वातील समता पॅनलने जिंकल्या. या निवडणुकीत समता विरुद्ध गाडगेबाबा असे दोन पॅनल एक-दुसऱ्यासमोर उभे ठाकले होते. 13 जागांसाठी एकूण 26 उमेदवार मैदानात होते. त्यापैकी अध्यक्षपदावर तिघांनी दावा ठोकला होता. मात्र मावळते अध्यक्ष अजय देशमुख यांनी सर्वाधिक 182 मते प्राप्त करीत पाचव्यांदा हे पद स्वत:कडे राखण्यात यश मिळविले.

सदर निवडणुकीसाठी सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळात मतदान घेण्यात आले. या कालखंडात 304 पैकी 298 मतदारांनी (98 टक्के) मतपत्रिकांद्वारे पसंतीक्रम ठरवित मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्याच ठिकाणी अर्थात डॉ. के.जी. देशमुख सभागृहात दुपारी 2 वाजता मतमोजणी सुरु झाली. सायंकाळपर्यंत सर्व निकाल घोषित झाले होते. निवडणूक अधिकारी ऋतुराज दशमुखे यांच्या नेतृत्वात त्यांच्या चमूने मतदान व मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली.

Advertisement

त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार एस. डब्ल्यू. चहाकार यांना 105 तर अपक्ष डी. पी. वानखडे यांना सहा मते मिळाली. पाच मते अवैध घोषित करण्यात आली. उपाध्यक्षांच्या दोन जागांवर समता पॅनलचेच एन. बी. खैरे (१५७) आणि एस. एन. लोखंडे (148) विजयी झाले. दुसरीकडे सहसचिवांच्या दोन जागांपैकी एक जागा गाडगेबाबा पॅनलने जिंकली असून 184 मते मिळवत व्ही. आर. तुपट विजयी झाले. दुसरी जागा समता पॅनलचे पी. एस. मंडपे यांनी जिंकली. त्यांना 157 मते मिळाली. दुसरीकडे कोषाध्यक्ष पदावर व्ही. एस. चावरे (160) विजयी झाले. कार्यकारिणी सदस्यांच्या सहा पदांमध्ये प्रत्येकी 3 पदे तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमधून निवडावयाची होती. त्यात तृतीय श्रेणीतील पी. व्ही. देशमुख (168), एस. आर. हुसे (159) व के. पी. भोरे (153) आणि चतुर्थ श्रेणीतील पी. जी. ठाकूर (191), एन. सी. देशपांडे (163) आणि आर. एम. बुगल (151) यांचा समावेश आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement