पुन्हा बंदचा निर्णय: सिद्धार्थ उद्यान, लेण्या, मकबरा, किल्ला, ग्रामीणच्या शाळा बंद


Advertisement

औरंगाबादएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने वेरूळ-अजिंठा लेणी, दौलताबादचा देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा, सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय तसेच ग्रामीण भागातील शाळा-महाविद्यालय, कोचिंग क्लासेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. कोरोना संसर्ग वाढल्यामुळे मार्च २०२० पासून उद्यान आणि प्राणिसंग्रहालय बंद करण्यात आले. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर काही दिवसांसाठी पर्यटनस्थळे, उद्यान उघडण्यात आले. मात्र, दुसरी लाट सुरू झाल्याने पुन्हा बंदचा निर्णय घ्यावा लागला.

Advertisement

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने १२ नोव्हेंबरपासून उद्यान आणि प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले करण्यात आले हाेते. १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतर आणि १८ वर्षांखालील मुला-मुलींना मास्क सक्तीचे करत प्रवेश देण्यात येत हाेता. दरम्यान, ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांचे ऑनलाइन वर्ग सुरू राहतील, अशी माहिती जि.प.च्या सीईओंनी दिली.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement