पुन्हा धोनी बॅट खाताना दिसला; फोटो होतोय व्हायरल, पण तो असं का करतो?


Advertisement

IPL 2022: मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दिल्लीविरुद्ध सामन्यात चेन्नईच्या संघानं 91 धावांनी विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील चेन्नईचा हा चौथा विजय होता. तर, महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) चेन्नईचा पुन्हा कॅप्टन झाल्यापासून सीएसकेचा दुसरा विजय आहे. या सामन्यात धोनी 8 बॉलमध्ये नाबाद 21 धावांची वादळी खेळी केली. दरम्यान, सोशल मीडियावर धोनीचा एक फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात धोनी दिल्लीविरुद्ध फलंदाजी करण्यापूर्वी त्याची बॅट खाताना दिसत आहे. परंतु, धोनी असा का करतो, यामागचं कारण त्याचा जुना सहकारी अमित मिश्रानं (Amit Mishra) सांगितलं आहे.

अमित मिश्रा काय म्हणतोय…
नुकतंच अमित मिश्रानं एक ट्विट केलं आहे. ज्यात धोनी बॅट खाताना का दिसतो? याचं कारण त्यानं सांगितलं आहे. “धोनी अनेकदा त्याची बॅट का खातो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, तो हे बॅटवरील टेप काढण्यासाठी करतो. त्याला स्वच्छ बॅट आवडते. तो खेळताना त्याच्या बॅटवर एकही टेप किंवा दोरा निघालेला दिसणार नाही,’ असं अमित मिश्रानं म्हटलं आहे. 

Advertisement

ट्वीट-

आयपीएल 2022 मधील चेन्नईची कामगिरी
आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनीनं चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाकडं संघाच कर्णधारपद सोपवलं होतं. परंतु, रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं निराशाजनक कामगिरी केली. रवींद्र जाडेच्या नेतृत्वात चेन्नईनं आठ पैकी दोन सामने जिंकले. त्यानंतर पुन्हा धोनीकडं चेन्नईच्या संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं तीन पैकी दोन सामने जिंकले असून एकामध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. चेन्नई 11 सामन्यांपैकी केवळ चार सामने जिंकले आहेत. चेन्नईचे सध्या 8 गुण असून त्यांना आणखी तीन सामने खेळायचे आहेत. 

Advertisement

हे देखील वाचा- 

AdvertisementSource link

Advertisement