पुन्हा गुडघ्याला बांशिंग?: राज्यात गणपती उत्सवाच्या आधी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा, मुंबईत हालचालींना वेग, तारीखही ठरली

पुन्हा गुडघ्याला बांशिंग?: राज्यात गणपती उत्सवाच्या आधी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा, मुंबईत हालचालींना वेग, तारीखही ठरली


मुंबई20 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू झाली आहे. इतकेच नाही तर त्याची तारीखही ठरली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या संदर्भात मुंबईत हालचालींना वेग आला असून मंत्रिपदासाठी गुडघ्याला बांशिंग बांधून तयार असलेले आमदार पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

आगामी गणेश उत्सवापूर्वी राज्याचे शिंदे-फडणवीस-पवार सरकार उर्वरित चौथ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे. आगामी गणेश उत्सवापूर्वीच हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असाही दावा केला जात आहे. आता नव्याने समावेश होणाऱ्या मंत्र्यांची संख्या 14 आहे. यात कोणकोणत्या आमदाराची वर्णी लागते, ते पाहावे लागणार आहे. याबाबत नुकतीच मुंबईमध्ये वरीष्ठ नेत्यांची बैठक देखील झाली. यात सर्व फार्मुला ठरला आहे.

भाजपला सर्वाधिक मंत्रिपदे

Advertisement

सध्या सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांपैकी भाजपकडे सर्वाधिक आमदारांची संख्या आहे. त्यामुळे या चौदा जागांपैकी सात जागा या भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तर इतर जागा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वाटल्या जाण्याची शक्यता आहे. इतर सर्व सात जागा शिवसेनेला मिळणार होता. मात्र, आता यातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावा लागणार आहे.

कोणाची वर्णी लागणार?

Advertisement

शिवसेनेच्या वतीने मंत्रिपदासाठी गेल्या वेळीच अनेक आमदार इच्छुक होते. मात्र, अजित पवार यांच्या सत्तेतील प्रवेशामुळे शिवसेनेतील आमदारांची संधी हुकली होती. या वेळी मात्र, ते आमदार आशावादी असल्याचे दिसून येत आहेत. मात्र, यात आता कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

गणेशोत्सवापूर्वी राज्यात कधीही मंत्रिमंडळ विस्तार – तटकरे

Advertisement

राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. गणेशोत्सवापूर्वी राज्यात कधीही मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, असे तटकरे यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना सुनील तटकरे म्हणाले की, तिन्ही पक्षांमध्ये पालकमंत्र्यांबाबत निर्णय झाला असून गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तसेच पालकमंत्र्यांच्या नियुक्तीबाबत निर्णय होऊ शकतो.Source link

Advertisement