पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस महिला पक्षाचे महागाई विरोधात आंदोलन: रस्त्यावर चूल मांडून बनवला दिवाळीचा फराळ; सरकार विरोधात केली घोषणाबाजी


पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

गेल्या अनेक वर्षापासून देशभरातील नागरिक जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने होरपळत आहे. अशा परिस्थितीत वारंवार गॅसचे दरवाढ वाढून केंद्र सरकारने 15 सिलेंडर मिळतील व त्यापुढे प्रत्येक सिलेंडर जास्त दराने घ्यावा लागेल असे जाहिर केले आहे.

Advertisement

दरम्यान, या गोष्टीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराच्या वतीने रस्त्यावर चूल मांडून दिवाळीच्या फराळाचे पदार्थ महिला कार्यकर्त्यांनी बनवले. व अनोख्या पद्धतीने सोमवारी (03 ऑक्टोबर) आंदोलन केले.

घोषणाबाजी केली

Advertisement

पुण्यातील टिळक रस्त्यावरील अभिनव महाविद्यालयाच्या चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, रुपाली ढोंबरे पाटील, मृणालिनी वाणी, शिल्पा भोसले उपस्थित होते. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

जनतेला दिलासा देणे गरजे​​​​​​​चे

Advertisement

शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, केंद्र सरकारने नागरिकांना मर्यादित गॅसचा पुरवठा करण्यासोबतच गॅसची भरमसाठ पध्दतीने किंमत वाढवलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. गोरगरीबांच्या दृष्टीने, अत्यंत महागाई सध्या केंद्र शासनाच्या चुकीच्या निर्णयामुे झालेली असून केंद्र सरकारने महागाई करुन सर्वसामान्य जनतेला दिलासा देणे गरजेचे आहे.

कार्यकर्त्यांनी प्रश्न केले उपस्थित

Advertisement

परंतु सरकार अशाप्रकारे कोणता निर्णय न घेता दिवसेंदिवस महागाईत वाढ करते. हिंदुत्ववादी सरकार सत्तेत असल्याचे सांगण्यात येते की पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आहे तर हिंदू सुरक्षित आहे. मात्र, 400 रुपयांचा गॅस सिलेंडर 1100 रुपये करण्यात आला असून, लोकांनी सिलेंडर वापरुच नये असा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. सिलेंडरच्या किंमतीत दरवर्षी 20 ते 25 टक्के भाववाढ मोदी सरकारमुळे होत आहे. 15 सिलेंडर नंतर जो काही पुढच्या सिलेंडर बाबत काळाबाजर होईल त्याला जबाबदार कोण? सर्वसामान्यांना सिलेंडरला मिळणारी सबसिडी ही बंद झाली याला जबाबदार कोण? बेरोजगारी वाढल्याने लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहे.

नोकऱ्या उपलब्ध करा

Advertisement

जर महागाईचा दर अशाचप्रकारे वाढवायचा असेल तर त्याप्रमाणात नोकऱ्या देखील उपलब्ध झाल्या पाहिजे. परंतु तसे न होता केवळ आपल्या जवळच्या मूठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी महागाई वाढवली जात आहे. त्यामुळे पुढील काळात सर्वसामान्य लोकांनी जगायचे कसे…? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement