पुण्यात युवा 20 कन्स्ल्टेशन परिषद संपन्न: भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप इकोसिस्टीम- केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर


पुणे7 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढणारी व सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेने मोठ्या प्रमाणात प्रगती करत जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांपर्यंतचा पल्ला गाठला आहे. गेल्या आठ वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम बनला आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री यांनी शनिवारी येथे दिली.

Advertisement

पुण्यातील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ ) तर्फे “युवा 20 कंसल्टेशन” चे आयोजन भारताच्या “जी- 20 ” प्रेसीडेंसी अंतर्गत व भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचा उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अनुराग ठाकूर, उपस्थित होते. स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर हे उद्घाटन समारंभाचे प्रमुख वक्ते होते. डॉ. शां. ब. मुजुमदार, संस्थापक व अध्यक्ष, सिंबायोसिस आणि कुलपती,सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) अध्यक्षस्थानी होते.

Advertisement

नेतृत्वात आशा दिसते

गेल्या पाच वर्षात भारत मोबाईल फोन बनवणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश बनला आहे. देशात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक झाली आहे. भारतीय तरुणांच्या यशस्वीतेच्या कथा आज जगाला प्रेरणा देत आहेत. संपूर्ण जगाला भारताच्या नेतृत्वात आशा दिसते’.असेही अनुराग ठाकूर पुढे म्हणाले.

Advertisement

देशाचे भविष्य तरुण

डॉ. संदीप वासलेकर यांनी तरुण लोक हे भारताचे भविष्य असल्याचे नमूद केले. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचे एक विश्व आहे. काही नेते युद्धे कायम ठेवत आहेत, ते नवीन शस्त्रे तैनात करत आहेत. या आण्विक युद्धात काही तासांत पृथ्वीवरील मानवी अस्तित्व संपवण्याची क्षमता आहे. तर दुसरीकडे आशेचे जग आहे.

Advertisement

‘वसुधैव कुटुंबकम’च वाचवणार

जगातील 193 देशांपैकी 23 देशांनी संरक्षण सोडले आहे. त्यांच्याकडे आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स यापैकी काहीही नाही. त्यांच्याकडे संरक्षण मंत्रीही नाही.”वसुधैव कुटुंबकम” हे तत्वज्ञान आपल्या सर्वांना वाचवू शकते, असे डॉ. वासलेकर म्हणाले.

Advertisement

डॉ.विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका, सिंबायोसिस व प्र- कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रजनी गुप्ते , कुलगुरू,सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांनी आभार मानले. अमृता रुईकर यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement