पुण्यात महिलेची साडेसात लाखांची फसवणूक: ऑनलाईन जुने कपाट विक्री दरम्यान महिलेस भामटयाचा गंडा


पुणे4 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

ओएलएक्स या वस्तू खरेदी आणि विकिरच्या संकेतस्थळावर घरातील जुने कपाट विक्रीची जाहिरात देणाऱ्या महिलेला सायबर चोरट्यांनी साडेसात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कपाट खरेदी करण्याचा बहाणा करणाऱ्या चोरट्याने महिलेला चुकून आठ लाख रुपये पाठविल्याचा बनावट स्क्रीन शाॅट पाठवून तिची फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत आदील फारुखभाई शेख या आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत एका 37 वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हडपसर भागातील अमानोरा टाऊनशिप परिसरात कुटुंब समवेत रहण्यास आहे. काही दिवसापूर्वी महिलेने घरातील जुने कपाट विक्रीची जाहिरात गृहोपयोगी वस्तू खरेदी विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर टाकली होती. आरोपी आदिल शेख याने त्यानुसार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्याने कपाट खरेदी करायचे असल्याचा बहाणा सांगून महिलेकडून बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर महिलेच्या मोबाइल क्रमांकावर आरोपीने पुन्हा संपर्क साधला.

माझ्याकडून तुमच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने चुकून आठ लाख रुपये पाठविण्यात आले आहेत, अशी बतावणी केली. त्यानंतर त्याने महिलेला आठ लाख रुपये हस्तांतरित झाल्याचे बनावट स्क्रीन शाॅट त्याने पाठविले. महिलेने शहानिशा न करता कपाट विक्रीतील रक्कम वजा करुन आरोपी आदिलच्या बँक खात्यावर सात लाख 65 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने पाठविले. त्यानंतर महिलेने आदिलने पाठविलेल्या पैशांबाबत बँकेकडे विचारणा केली. तेव्हा महिलेच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे समजले. महिलेने आरोपीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा त्याने प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने याबाबत हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले पुढील तपास करत आहेत.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement