पुण्यात गुंतवणुकीच्या अमिषाने सव्वाकोटींचा ऑनलाइन गंडा: भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यात गुंतवणुकीच्या अमिषाने सव्वाकोटींचा ऑनलाइन गंडा: भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


पुणे2 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

क्रिप्टाे करन्सी ट्रेडिंग मध्ये गुंतवणुक केल्यास अल्पावधीत चांगल्याप्रकारे फायदा हाेईल असे सांगून एका व्यवसायिकाची तब्बल एक काेटी 27 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वेगवेगळे टेलीग्राम आयडीधारक, सँग, मिस अॅना कर्दाशियन, आलस्या अशी नावे असलेले अनाेळखी व्यक्ती यांचेवर भाेसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

याबाबत जगदीश दत्तात्र्य मुळे (वय-46,रा.भाेसरी,पुणे) यांनी पाेलिसांकडे आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 13/6/2023 ते आत्तापर्यंत घडलेला आहे. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आराेपी यांनी संगनमताने मिळून तक्रारदार यांना क्रिप्टाे करन्सी ट्रेडिंग मध्ये करन्सी खरेदी- विक्रीच्या माध्यमातून चांगल्याप्रकारे फायदा मिळवून देण्याचे अमिष दाखवून तक्रारदार याचंा विश्वारस संपादन केला. जीईई, सीएई या फसव्या क्रिप्टाे करन्सी ट्रेडिंग अॅप्लीकेशन मध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडून तक्रारदार यांचेकडून एक काेटी 27 लाख 29 हजार रुपये रक्कम फसवणुकीने प्राप्त करुन घेतले. सदर रक्कम स्वत:चे फायद्याकरिता वापरुन फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस निकाळजे पुढील तपास करत आहे.

टास्क बहाण्याने 15 लाखांची फसवणूक

Advertisement

हडपसर परिसरातील बाेराटेनगर येथे राहणाऱ्या अभिषेक माईती (वय-31) या तरुणासाेबत अज्ञात टेलीग्रामधारक, माेबाईल क्रमांक वापरकर्ते यांनी संर्पक करुन टेलीग्रामच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास चांगल्या प्रकारे परतावा मिळेल असे सांगत विश्वास संपादन केला. त्यानुसार सदर तरुणाला वेगवेगळे टास्क देऊन त्यात गुंतवणुक करण्यास भाग पाडून तब्बल 14 लाख 88 हजार रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात अज्ञात आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.



Source link

Advertisement